मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Amitabh Bachchan Birthday: बिग बींनी वाढदिवशी घेतला मोठा निर्णय ; ट्रोलिंगला कंटाळून पानमसाला कंपनीसोबतचा करार संपवला

Amitabh Bachchan Birthday: बिग बींनी वाढदिवशी घेतला मोठा निर्णय ; ट्रोलिंगला कंटाळून पानमसाला कंपनीसोबतचा करार संपवला

अलिकडे अमिताभ यांनी पान मसाल्याची जाहिरात केली ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता अमिताभ यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे

अलिकडे अमिताभ यांनी पान मसाल्याची जाहिरात केली ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता अमिताभ यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे

अलिकडे अमिताभ यांनी पान मसाल्याची जाहिरात केली ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता अमिताभ यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे

मुंबई , 11 ऑक्टोबर :बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे आणि जाहिरीतीचे वेगळेच नाते आहे. अमिताभ यांनी   (Amitabh Bachchan 79th Birthday)आजपर्यंत अनेक जाहिरातीत काम केले आहे. अमिताभ यांनी केलेल्या कोणत्याही जाहिरातीवर लोक अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र अलिकडे अमिताभ यांनी पान मसाल्याची जाहिरात केली ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता अमिताभ यांनी आज त्यांच्या वाढदिनी  एक मोठे पाऊल  उचलले आहे. त्यांनी या कंपनीला नकार देत त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार संपवला आहे.

प्रमोशनसाठी मिळालेले पैसे देखील केले परत

कमला पसंतसोबत अमिताभ यांनी करार संपवला असून त्याबद्दल त्यांनी अधिकृत स्टेटमेंट जाहीर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,'कमला पसंद… जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि गेल्या आठवड्यात त्यातून बाहेर पडले. त्यांना माहित नव्हते की ही जाहिरात सरोगेट जाहिरातीत येते. अमिताभ यांनी ब्रँडसोबतचा करार संपवला आहे. तसेच प्रमोशनसाठी मिळालेले पैसे देखील त्यांनी परत केले आहेत.

वाचा :Happy B'day Amitabh Bachchan: 'त्या' रात्री असं काय झालं ज्यामुळे जया-अमिताभ यांच्या जीवनातून दूर झाल्या रेखा

पान मसाला लोकांच्या आरोग्यावर परिणाम करतो

काही दिवसापूर्वी अमिताभ बच्चन आणि राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष शेखर साल्कर यांना एक पत्र लिहिले होते, ज्यात असे म्हटले होते की, पान मसाला लोकांच्या आरोग्यावर परिणाम करतो. त्यात असेही लिहिले होते की, बिग बी पल्स पोलिओ मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, त्यांनी ही जाहिरात त्वरित सोडली पाहिजे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कमला पसंद या जाहिरातीवरून करण्यात आले होते ट्रोल

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कमला पसंद या जाहिरातीवरून एका नेटकऱ्याने कमेंट करून ट्रोल केले होते. त्या यूजरने कमेंट करत म्हटले होते की,'नमस्कार सर, एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. कमला पसंत पान मसाला जाहिरातीमध्ये काम करण्याची काय गरज होती?' या कमेंटवर अमिताभ यांनी उत्तर दिले, 'नमस्कार, कोणत्याही व्यवसायामध्ये जर कोणाचे चांगले होत असेल, तर असा विचार करू नये की आपण त्यामध्ये का काम करावे. व्यवसायात फक्त कामाचा विचार केला जातो. तुम्हाला वाटते की मी हे काम केले नाही पाहिजे पण हे काम करून मला तर पैसे मिळतातच पण आमच्या कामामध्ये जे कर्मचारी आहेत किंवा इतर लोक आहेत त्यांना देखील काम आणि पैसे मिळतात.'

वाचा : Happy Birthday Amitabh Bachchan: बिग बींच्या फिटनेसचं रहस्य आहे तरी काय? या 4 गोष्टींपासून राहतात दूर

अमिताभ बच्चन यांचा आज 79 वा वाढदिवस

बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. या वयातही ते चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood News, Entertainment