मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg boss marathi 4 : प्रेक्षकांची लाडकी शेवंता दिसणार बिग बॉसच्या घरात; प्रोमो पाहून चाहत्यांनी लावला अंदाज

Bigg boss marathi 4 : प्रेक्षकांची लाडकी शेवंता दिसणार बिग बॉसच्या घरात; प्रोमो पाहून चाहत्यांनी लावला अंदाज

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर

बिग बॉस मराठी 4 च्या 2 ऑक्टोबरला ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांसमोर येणारच आहे मात्र त्याआधी स्पर्धकांची पहिली झलक समोर आली आहे. आता बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे. ही अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 1 ऑक्टोबर :  गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा सुरू आहे. चौथं पर्व कधी सुरू होणार याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून येत्या २ ऑक्टोबर पाहून बिग बॉस मराठीचं नवीन पर्व सुरू होत आहे. या नवीन पर्वात नेमकं कोण कोण सहभागी होणार हे अद्यापही समोर आलं नाही. त्यामुळं प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. स्पर्धकांचा  चेहरा बिग बॉस मराठी 4 च्या 2 ऑक्टोबरला ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांसमोर येणारच आहे मात्र त्याआधी स्पर्धकांची  ग्रँड प्रीमियरची पहिली झलक समोर आली आहे. त्यावरून चाहते ते स्पर्धक कोण कोण असतील याचा अंदाज लावत आहेत. आता बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे.

बिग बॉस कार्यक्रम आवडीनं पाहिला जातो. त्यामुळंच या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांच्याकडेंच सोपावण्यात आली आहे. आता या चौथ्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून कोण कलाकार सहभागी होणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. बिग बॉसच्या  ग्रँड प्रीमियरचा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. त्यामध्ये लाखो दिलांची धडकन म्हणून एक अभिनेत्री नृत्याविष्कार सादर करताना दिसत आहे. या अभिनेत्रीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी तिला प्रेक्षकांनी मात्र ओळखलं आहे. ही अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत.

हेही वाचा - Har Har Mahadev : अजय पुरकर नंतर आता बाजीप्रभू देशपांडे साकारणार 'हा' दमदार अभिनेता; तुम्ही ओळखलं का?

बिग बॉस मराठी 4चा प्रीमियरचा प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रोमोमध्ये डान्स करत असलेली अभिनेत्री ही अपूर्वा नेमळेकर  आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी 'शेवंता' होय. तिची शेवंता ही  भूमिका फारच लोकप्रिय झाली. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंतामुळे अपूर्वाला नवी ओळख मिळाली. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील अभिनेत्री  अपूर्वाचा आहे का हे उद्या कळेल.

तर काहींनी हा प्रोमो पाहून ही अभिनेत्री  तेजश्री जाधव असल्याचा देखील अंदाज लावला आहे.  तेजश्री जाधव दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी मराठी मुलगी आहे. तीचं  सध्या ओटीटीवरील कामासाठी कौतुक होत आहे. ‘द जोकर : अ स्ट्रेंज किडनॅपर’ या हिंदी सीरीजमधून चाहत्यांसमोर ती आली आहे. तसंच ‘अट्टी’ या तमिळ चित्रपटानंतर ‘अकिरा’, ‘माधुरी टॉकीज’ या हिंदी सीरीजमध्येदेखील तिनं साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं. हा प्रोमो पाहून ती अभिनेत्री तेजश्री असल्याचा देखील अंदाज अनेकांनी लावला आहे.

बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या कलाकार स्पर्धकांचे वाद, एकमेकांच्या काढल्या जाणाऱ्या उखाळ्या पाखाळ्या, कार्यक्रमातल्या टास्कमध्ये एकमेकांशी होणारी हाणामारी या सगळ्यामुळं हा कार्यक्रम अनेकदा वादग्रस्त ठरतो. तरी देखील या कार्यक्रमाची लोकप्रियता मालिकांइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक आहे. आता या चौथ्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून कोण कलाकार सहभागी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi actress, Marathi entertainment