मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi : एक आत एक बाहेर; बिग बॉस मराठीच्या घरातून आविष्कार दारव्हेकर बाहेर!

Bigg Boss Marathi : एक आत एक बाहेर; बिग बॉस मराठीच्या घरातून आविष्कार दारव्हेकर बाहेर!

याशिवाय आज घरात एक वाईल्ड कार्ड एन्ट्रीही झाली आहे.

याशिवाय आज घरात एक वाईल्ड कार्ड एन्ट्रीही झाली आहे.

याशिवाय आज घरात एक वाईल्ड कार्ड एन्ट्रीही झाली आहे.

    मुंबई, 31 ऑक्टोबर : आज बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. तर दुसरीकडे एक सदस्य घराबाहेर गेला आहे. सगळेच चाहते दर आठवड्याला वाट बघत असतात, ती म्हणजे बिग बॉसची चावडी कधी भरणार याची. दरम्यान आज अविष्कार दारव्हेकरला बिग बॉसच्या घराबाहेर (Discovery Darvecker outside Bigg Boss's house) जावं लागलं. अविष्कार बाहेर गेल्यानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. (Bigg Boss Marathi One inside one outside Avishkar Darvekar out of Bigg Boss Marathis house) या आठवड्यात बिग बॉसच्या चावडीवर विशाल निकमची महेश मांजरेकरांनी शाळा घेतली. त्याचे टास्क दरम्यान वागणे भीषण दिसले असे त्यांनी सांगत त्याला खडेबोल सुनावले तर मीनलला सल्ला दिला. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे सोनाली, मीरा, गायत्री आणि जयला दाखविण्यात आली. तर दादूस आणि तृप्तीताईंनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. हे ही वाचा-डोक्यावर टोपी-हातात दांडू' लवकरच भेटीला येतोय 'पांडू'; भाऊ-कुशलची जोडी करणार... बिग बॉसच्या घरामध्ये आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. आविष्कार, स्नेहा, सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये होते. या चार जणांमधून अविष्कार दारव्हेकरला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bigg boss, Bigg boss marathi

    पुढील बातम्या