जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'डोक्यावर टोपी-हातात दांडू' लवकरच भेटीला येतोय 'पांडू'; भाऊ-कुशलची जोडी करणार धम्माल

'डोक्यावर टोपी-हातात दांडू' लवकरच भेटीला येतोय 'पांडू'; भाऊ-कुशलची जोडी करणार धम्माल

'डोक्यावर टोपी-हातात दांडू' लवकरच भेटीला येतोय 'पांडू'; भाऊ-कुशलची जोडी करणार धम्माल

या वर्षाच्या सुरुवातीला ‘पांडू’ (Pandu) चित्रपटाची घोषणा झाली होती. तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपटात ‘पांडू’ नेमकं कोण साकारणार, ह्या चर्चांना वेग आला होता. आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑक्टोबर-  या वर्षाच्या सुरुवातीला ‘पांडू’  (Pandu)  चित्रपटाची घोषणा झाली होती. तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपटात ‘पांडू’ नेमकं कोण साकारणार, ह्या चर्चांना वेग आला होता. आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. आणि सोबतच चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. कारण चित्रपटात त्यांचा लाडका कलाकार भाऊ कदम  (Bhau Kadam) ‘पांडू’ साकारत आहे. तर कुशल बद्रिके  (Kushal Badrike)  ‘महादू’च्या भूमिकेत दिसणार आहे. ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.

जाहिरात

महाराष्ट्राला विनोदाची एक मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी साहित्य असो किंवा मराठी चित्रपट, मराठी नाटक असो की मराठी लोककला या सर्व कलाप्रकारात विनोदाचं स्थान कायमच वेगळं आणि अढळ असं राहिलेलं आहे. या विनोदी परंपरेला मोठं करण्याचं काम केलंय इथल्या अनेक विनोदवीरांनी. काळू-बाळूपासून ते अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डेपर्यंत विनोदवीरांच्या अनेक जोड्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. आजच्या घडीला विनोदातील हुकुमी एक्के म्हटलं की सर्वप्रथम नाव येतं ते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडीचं. या चित्रपटात ‘पांडू’ ही मुख्य व्यक्तिरेखा भाऊ कदम साकारत आहेत . या भूमिकेबद्दल बोलतांना भाऊ म्हणाले की, " सध्याच्या या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाच्या दोन घटका देणं आणि त्यांचा ताण हलका करणं यासारखं पुण्याचं काम दुसरं काहीच नाही. ‘पांडू’ प्रेक्षकांची ही गरज शंभर टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. दिग्दर्शक विजू मानेंसोबत काम करण्याचा अनुभव कायमच मजेशीर राहिलेला आहे आणि सोबतीला कुशल असल्यामुळे ही केमिस्ट्री अजूनच चांगली खुलून आली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी फार मोठी आणि महत्वाची बाब आहे." तुफान एनर्जीची देणगी लाभलेला आणि कोणतंही पात्र अगदी उत्कृष्ट साकारणारा कुशल या चित्रपटाबद्दल म्हणतो की,“मी या चित्रपटात महादू हवालदाराची भूमिका साकारतोय. मी आणि भाऊ, आम्ही आजवर विविध माध्यमांतून लोकांचं मनोरंजन केलंय. हीच परंपरा हा चित्रपटसुद्धा कायम ठेवेल यात शंकाच नाही. (हे वाचा: Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात ‘या’ अभिनेत्रीची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री ) गेल्या २१ वर्षात आमच्यातली मैत्री खूप घट्ट विणली गेलीये आणि हीच मैत्री पांडू आणि महादूच्या निमित्ताने प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.  अशात ‘पांडू’सारखा चित्रपट प्रेक्षकांना नुसतं हसवणारच नाही तर एक नवी ऊर्जाही देईल हा विश्वास मला आणि आमच्या संपूर्ण टीमला आहे.” गेल्या दोन वर्षांपासून कोविड १९ मुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी व  प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी झी स्टुडिओजची निर्मिती असलेला आणि विजू माने यांनी दिग्दर्शित केलेला ‘पांडू’ येत्या ३ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात