मुंबई, 13 जून- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आजही शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक हे कार्य रंगणार आहे. काल या टास्कमधून शिक्षकांनी शिवानी सुर्वे, विद्याधर जोशी यांना नापास केले. तर विणाने तिच्या विदयार्थीसोबत सेल्फी काढला. आज देखील हा टास्क रंगणार असून पराग कान्हेरे घेत असलेल्या प्रेमशास्त्र या तासाला सगळ्यांनाच आपलं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. या तासात सगळ्याच सदस्यांनी बाजी मारली. आज या तासाला विणा आणि शिव यांचा आखो की गुस्ताकिया या गाण्यावर सुंदर डान्स पाहायला मिळणार आहे. तर शिवानी माधवला सांगताना दिसणार आहे, माझ्या फोटोवर कोणी नापास लिहायचे नाही, मी कायम पास होते असं शिवानी माधवला सांगताना दिसणार आहे. या सोबतच तिने तिच्या फोटोवर नापास लिहिलेले पुसून टाकले.
हेही वाचा- शाहरुख खानच्या मुलीला सुहाना मिळाला पहिला सिनेमा, लीक झाला फोटो
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये दोन्ही टीमने विद्यार्थी झालेल्या सदस्यांना नापास करायचे आहे. या टास्कवरूनच नेहा, शिवानी, अभिजित केळकर, माधव देवचके, दिंगबर नाईक, विद्याधर जोशी, अभिजीत बिचुकले यांच्यामध्ये मतभेद झालेले आज दिसणार आहेत. दुसऱ्या टीममधील कोणत्या सदस्याला नापास करायचे हे टीमला सर्वानुमते ठरवायचे आहे. नेहाच्या म्हणण्यानुसार तिला रुपालीला नापास करायचे आहे परंतु अभिजीत केळकरकडे रुपालीला नापास करण्याचे कोणतेही कारण नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.
हेही वाचा- ईशा- विक्रांतच्या भांडणात, संभाजी महाराजांनी मारली बाजी!
तर माधव, दिगंबर, विद्याधर आणि अभिजीत बिचुकले, यांना शिव काहीच करत नसल्यामुळे त्याला नापास करायचे आहे. यावर नेहाने नाराजगी व्यक्त करत, ‘बोलायची वेळ येते तेव्हा सगळेच हत्यार टाकून बसतात,’ असं म्हणते. आता पुढे या टास्कमध्ये शिक्षक झालेले सदस्य कोणाला नापास करतील कोणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगेल आणि कोण घराचा कॅप्टन कोण होईल हे पाहणे रंजक असणार आहे.
हेही वाचा- Happy Birthday Disha Patani- याच सात गोष्टींमुळे ती आहे स्टाइल आयकॉन
बिग बॉस मराठीच्या घरात काल काय घडले ?
काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी सुर्वे बिग बॉसला म्हणाली की, ‘मला या घरात रहायचे नाही, मला खूप त्रास होत आहे.’ शिवानी सुर्वेला रुग्णालयातदेखील नेण्यात आले. इथे तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या ज्यामध्ये कोणतेही दोष आढळले नाहीत. बिग बॉसच्या टीमने संपूर्ण काळजी घेऊनदेखील शिवानीने घरामध्ये कायद्याची गोष्ट करणे बिग बॉसला चुकीचे वाटले आणि म्हणूनच बिग बॉसने तिला हे प्रकरण कायद्याच्या कक्षेत येईल असं सांगितलं. यावर शिवानीने तिची बाजू मांडली आणि ती भावूक झाली.
VIDEO :जेव्हा सलमान खानने गायलं, 'गच्ची वरून कशी दिसते..'