मुंबई, 13 जून- शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. दररोज तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सुहानाचं फॅन फॉलोविंग कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाही. सुहाना बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार हे जाणून घ्यायची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. सुहाना सिनेमांमध्ये पदार्पण करत आहे. नुकतंच तिच्या सिनेमातील एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला. सुहानाचा हा सिनेमा बॉलिवूड नाहीये.
IND vs NZ: आता भारताला पावसापासून फक्त प्रियांका चोप्राच वाचवू शकते
सुहानाच्या फॅन क्लबने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सुहानाचा ग्लॅमर लुक दिसत आहे. ती एका गाडीत बसून कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. सुहानाचा हा फोटो व्हिडिओमधून घेतल्याचं स्पष्ट कळतं. या मोनोक्रॉम फोटोमध्ये सुहाना गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेली दिसते. ‘सुहानाच्या आगामी लघुपटातील एक शॉट’ असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं. मात्र हा फोटो आणि यासंबंधीत करण्यात आलेला दावा खरा आहे की नाही हे अजून कळू शकलेले नाही.
Happy Birthday Disha Patani- याच सात गोष्टींमुळे ती आहे स्टाइल आयकॉन
ईशा- विक्रांतच्या भांडणात, संभाजी महाराजांनी मारली बाजी!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा लघुपट सुहानाचे मित्र त्यांच्या कॉलेजमध्ये बनवत आहेत. हे जर खरं असेल तर सुहानाला सिनेमांत रुची असल्याचं स्पष्ट होतं. याचबरोबर येत्या काही वर्षांमध्ये ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल यातही काही शंका नाही. सध्या सुहाना युकेमध्ये थिएटर आणि सिनेमांचं शिक्षण घेत आहे. गेल्यावर्षी शाहरुख मुलीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी युकेमध्ये तिच्या कॉलेजमध्ये गेला होता.
आपल्या बाबांप्रमाणे सुहाना फार ग्लॅमरस आयुष्य जगते. तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड होत असतात. नुकतंच तिने एका मासिकासाठी फोटोशूट केलं. या फोटोशूटमुळे ती चर्चेतही आली होती. याशिवाय कोलकत्यात एका जवळच्या मैत्रिणीच्या लग्नातही सुहाना आई गौरी खानसोबत गेली होती. त्यावेळचा तिचा लुकही फार ग्लॅमरस होता.
VIDEO :जेव्हा सलमान खानने गायलं, 'गच्ची वरून कशी दिसते..'