मुंबई, 13 जून- स्टाइल आणि ग्लॅमरची क्वीन अशी ओळख असलेली दिशा पाटनी आज तिचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १३ जून १९९२ मध्ये बरेलीमध्ये दिशाचा जन्म झाला. आज बॉलिवूडमधील ती स्टायलिस्ट आयकॉन झाली आहे.
बाघी २, भारत आणि कुंग फू योगा यांसारख्या सिनेमांपासून ते अनेक ब्रँडची पोस्टर गर्ल होईपर्यंत दिशाने लाखो चाहत्यांच्या मनात हक्काची जागा तयार केली आहे. तिचे इन्स्टाग्रामवरचे हॉट फोटो पाहून ती का फिटनेस आणि ग्लॅमर आयकॉन आहे ते तुम्हालाही कळेल.
कॅल्वीन क्लेनच्या फोटोशूटचे अनेक फोटो दिशा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. या काळ्या टॉपमध्ये ती फार मादक दिसत आहे.
पांढरा टॉप आणि रिप डेनिममध्ये ती कोणत्याही राजकन्येपेक्षा कमी दिसत नाह. भारत सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला तिने हा लुक केला होता. चॉकलेटी केस आणि गळ्यात मोत्याची माळ घातली होती. त्या एका छोट्याशा माळेने तिचा लूक पूर्ण केला होता.
समर लुक कसा असावा हे दिशाशिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नाही. गुलाबी रंगाच्या या स्वीम सूटमध्ये दिशाने हॉटनेसच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या. मार्चमध्येच तिने एका ब्रँडसाठी फोटोशूट केलं. टॅन बॉडीवर गुलाबी स्वीम सूट फारच हॉट दिसत आहे.
फक्त कन्टेपनरी लुकमध्येच नाही तर दिशा पारंपरिक वेशातही तेवढीच सुंदर दिसते. आकाश अंबानीच्या लग्नात दिशाने डिझायनर पांढरी साडी नेसली होती. यावेळी ती टायगर श्रॉफसोबत या लग्नाला आली होती.
अभिनेत्री फक्त मेकअपमध्येच सुंदर दिसतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर यातही दिशा तुम्हाला खोटं ठरवेल कारण तिने तिचा कुत्रा ‘गोकु’सोबतचा सकाळचा एक फोटो शेअर केला. यात ती मेकअपशिवाय दिसतेय.
कडक उन्हातही कोणी सुंदर दिसू शकतं तर ती फक्त दिशा पाटनीच. दिशाने जानेवारीमध्ये एक फोटोशूट केलं होतं. या फोटोमध्ये तिने चंदेरी रंगाच्या गाऊनवर काळ्या रंगाचे बूट घातले होते.
व्हेकेशन गोल्स कसे असावेत हेही दिशा तिच्या चाहत्यांना वारंवार दाखवते. मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेतानाचा एक फोटो दिशाने शेअर केला. यावेळी तिने निळ्या रंगाचा फ्लॉरल ड्रेस घातला होता. मोकळे केस, निळाशार समुद्र आणि दिशाचं ते मनमोहक हसू सर्वांना वेड लावण्यासाठी पुरेसं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा