मुंबई, 30 ऑक्टोबर : बिग बॉस मराठी सीझन 4 सध्या टेलिव्हिजनवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. तब्बल 3 आठवड्यांनी घरातील सदस्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत. घरात चौथ्या आठवड्यात तिसरा सदस्य घराबाहेर पडला आहे. काल रविवारी बॉक्सर योगेश जाधवने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. विकास सावंत आणि योगेशमधून कमी वोट मिळाल्यानं योगेश काल घराबाहेर पडला. मागच्या आठवड्यात घरातून बाहेर येताच मेघानं योगेश जाधव बद्दलही महत्त्वाचे खुलासे केले होते. तिने योगेशवर अनेक आरोप केले होते. मेघानं योगेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे असं सगळेजण म्हणत असतानाच आता घरातून बाहेर येताच योगेशने त्याच्यावरील सर्व आरोप झिडकारले आहेत. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत योगेशने मेघाबद्दल मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याला मेघाने त्याच्यावर केलेल्या आरोपांविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्याने मेघाच्या बोलण्याचा निषेध केला. मेघा योगेश विषयी म्हणाली होती कि, ‘‘बिग बॉसच्या घरात योगेश खूप लोकांना तो बापावरून बोलला होता. सतत एखाद्याला बापावरून बोलणं योग्य नाही हे मी त्याला सांगितलं होतं. त्याने अर्वाच्च भाषेत माझ्यासहित इतर सदस्यांना शिव्या दिल्या. आमच्यासाठी त्याने घाणेरडे शब्द वापरले होते.’’ असे आरोप तिने केले होते. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: स्पर्धकांसोबत असभ्य भाषेत बोलणं योगेशला भोवलं; बिग बॉसच्या घरातून घेतली एक्झिट या आरोपांचं खंडण करत योगेश यावेळी म्हणाला कि, ‘‘माझा निषेध आहे या सगळ्या आरोपांवर. मी असं काही बोललो नाही. मेघा मला मोठ्या बहिणीप्रमाणे आहे तसेच ती माझी चांगली मैत्रीण आहे. तिचा माझ्याविषयी काहीतरी गैरसमज झाला आहे. तिला टास्कदरम्यान माझा शब्द चुकीचा ऐकू गेला. महेश सरांनी सुद्धा त्यांना हेच सांगितलं होतं. ’’ त्याचबरोबर योगेश म्हणाला कि, ‘‘याविषयी मी त्यांची माफी मागितली आहे.’’
तसेच ‘‘मी पैसे देतो ताई तुम्ही नाचून दाखवा’’ असं देखील योगेश म्हणाला असं मेघा म्हणाली होती. पण योगेशने हे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. याविषयी बोलताना योगेश म्हणाला कि, ‘‘मी मेघा ताईला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मानतो. घरात देखील त्यांना मी तशीच वागणूक दिली. मोठ्या बहिणीला मी नाचून दाखव असं कसं म्हणेन. या त्यांच्या म्हणण्याला माझा निषेध आहे. मी असं काही बोललोच नाही.’’ असं योगेश म्हणाला.
मेघा घाडगे बद्दल बोलताना योगेश पुढे म्हणाला कि, ‘‘मी त्यांना सॉरी म्हणालो पण त्यांनी माझं सॉरी घेतलं कि नाही मला माहित नाही. पण मी त्यांचा रुसवा मिटवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे.’’ मागच्या आठवड्यात घरात झालेल्या टास्कवरून आज चावडीवर महेश मांजरेकर स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. दर आठवड्यापेक्षा यावेळी मांजरेकर स्पर्धकांना सक्त ताकिद देत खडे बोल सुनावले आहेत. याचबरोबर काल बिग बॉसच्या घरात स्नेहलता वसईकर हिची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे.

)







