जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Megha Ghadge Exclusive: 'योगेशने मला अर्वाच्च भाषेत...; बिग बॉसमधून बाहेर पडताच मेघाचा योगेशवर गंभीर आरोप

Megha Ghadge Exclusive: 'योगेशने मला अर्वाच्च भाषेत...; बिग बॉसमधून बाहेर पडताच मेघाचा योगेशवर गंभीर आरोप

मेघा घाडगे

मेघा घाडगे

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच मेघा घाडगेने न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत बिग बॉसच्या घरातील सदस्यांबाबत मोठे खुलासे केले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर : बिग बॉस मराठी सीझन 4 सध्या टेलिव्हिजनवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. तब्बल 3 आठवड्यांनी घरातील सदस्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत. घरात तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्या सदस्य घराबाहेर पडला आहे. रविवारी अभिनेत्री मेघा घाडगेनं बिग बॉस च्या घराचा निरोप घेतला. किरण माने, अमृता देशमुख आणि मेघा यांच्यातून मेघा घाडगेला कमी वोट मिळाल्यानं मेघा घराबाहेर पडली. घरातून बाहेर येताच मेघानं घरातील सदस्यांना किरण मानेपासून दूर रहा, असा सूचक सल्ला दिला. मात्र मेघा घरातून बाहेर पडल्यानंतर केवळ किरण मानेच नाही तर योगेश चव्हाणबद्दलही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. योगेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे असं म्हणायला हरकत नाही.मेघा घाडगेने न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत बिग बॉसच्या घरातील सदस्यांबाबत मोठे खुलासे केले आहेत. आपण पाहिलं तर तिसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमध्ये मेघा आणि योगेश यांच्यात कडाक्याची भांडण झाली. योगेशचा राग अनावर झाल्यानं त्यानं सदस्यांचा बाप काढला. यावरून मेघा आणि योगेशमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुसिव्ह बातचित करताना मेघानं मात्र योगेशचं सत्य बाहेर आणलं आहे. त्याचप्रमाणे बिग बॉसच्या घरात झालेल्या अर्ध्या गोष्टी टेलिव्हिजनवर दाखवण्यात आल्याचं नाही असंही मेघा म्हणाली. हेही वाचा - Megha Ghadge Exclusive: ‘मला म्हणाला ताई पैसे देतो नाचून दाखवा’, मेघा घाडगेनं समोर आणला योगेशचा खरा चेहरा योगेशबद्दल बोलताना मेघा म्हणाली, “योगेशचा पहिल्या दिवसापासून तोंडावर ताबा नाहीये. दरवेळी मी त्याला सावध केलं आहे. तू जे काही बोलतोस ते सगळेच ऐकून घेऊ शकत नाही. तु बोलताना जे बोलतो ते तोंड सांभाळून बोलत जा. कारण तू जे बोलतोस ते मनाला लागतं. हे मी त्याला बोल्ले. पण तो काय बोलला हे नाही दाखवलं गेलं नाही. ज्यामुळे मी हर्ट झाले त्यामुळे मी त्याला बोलले.  पण त्या गोष्टीच दाखवण्यात आल्याच नाहीत”.

मेघा पुढे म्हणाली, बिग बॉसच्या घरात योगेश खूप लोकांना तो बापावरून बोलला होता. सतत एखाद्याला बापावरून बोलणं योग्य नाही हे मी त्याला सांगितलं होतं. त्याने अर्वाच्च भाषेत माझ्यासहित इतर सदस्यांना शिव्या दिल्या. आमच्यासाठी त्याने घाणेरडे शब्द वापरले होते. ते लोकांना दाखवण्यात आलेलं नाही. याच कारणावरून अक्षय आणि योगेशची खूप कडाक्याची भांडणं  झाली होती. मांजरेकरांनीही त्याला बाप काढण्यावरून सक्ती दिली, असही मेघा म्हणाली.  

News18लोकमत
News18लोकमत

तिसऱ्या आठवड्यात घरात झालेल्या टास्कवरून आज चावडीवर महेश मांजरेकर स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली.  दर आठवड्यापेक्षा यावेळी मांजरेकर स्पर्धकांना सक्त ताकिद देत खडे बोल सुनावले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात