मुंबई, 1 ऑक्टोबर : बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या कलाकार स्पर्धकांचे वाद, एकमेकांच्या काढल्या जाणाऱ्या उखाळ्या पाखाळ्या, कार्यक्रमातल्या टास्कमध्ये एकमेकांशी होणारी हाणामारी या सगळ्यामुळं हा कार्यक्रम अनेकदा वादग्रस्त ठरतो. तरी देखील या कार्यक्रमाची लोकप्रियता मालिकांइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक आहे. आता या चौथ्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून कोण कलाकार सहभागी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. आता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये दिसणार आहे. तिच्याविषयी या गोष्टी जाणून घ्या. अपूर्वाने झी मराठीवरील मालिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होता. पण ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंतामुळे अपूर्वाला नवी ओळख मिळाली. या मालिकेतील शेवंता खूपच गाजली होती. या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती. तिच्या शेवंता या भूमिकेने भल्याभल्याना घायाळ केलं आहे. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस च्या घरातील स्पर्धकांची संपूर्ण लिस्ट; जाणून घ्या कोण कोण सहभागी होणार पण लोकप्रियता मिळवून दिलेली मालिका रात्रीस खेळ चाले तिने अचानक सोडली होती. तिला तिच्या वजनावरून सेटवर हिनवले जाते. पेमेंट वेळेवर केलं जात नाही असे अनेक आरोप तिने मालिकेच्या निर्मात्यांवर केले होते. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आली होती. मालिकेतून तिने एक्झिट घेतल्यानंतर दुसऱ्या अभिनेत्रीने शेवटची जागा घेतली होती. पण ती फारशी लोकप्रिय झाली नाही. अपूर्वाने साकारलेली शेवटचं प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.
अपूर्वाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, ती रोहन देशपांडेसोबत विवाहबंधानात अडकली होती. अडकली. पारंपरिक पद्धतीनं मुंबईत दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यामुळं तिच्या रिलेशनशीपबद्दल अनेकदा चर्चा सुरू होत्या. पण तिनंही कधी याकडं लक्ष न देता अभिनयावर लक्ष केंद्रीत केलं. अशी अपूर्वा नेमळेकर आता बिग बॉसच्या घरात राडा करायला येत आहे.