मुंबई, 13 डिसेंबर : बिग बॉस मराठी 4 च्या घरातील सर्वांची लाडकी अभिनेत्री आणि स्पर्धक तेजस्विनी लोणारी हिला हाताला दुखापत झाल्यानं घरातून एक्झिट घ्यावी लागली. तेजस्विनीच्या जाण्यानं सर्वांनी नाराजी व्यक्त केली होती. टास्क दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तेस्विनीचा हात फ्रँक्चर झाला त्यामुळे तिला घरातून बाहेर पडावं लागलं. घरातून बाहेर आल्यानंतर तिनं ट्रिटमेंट सुरू केली आहे. पुढच्या काही दिवसात तिच्या हाताचं फँक्चर काढण्यात येईल असं सांगितलं. मात्र तेजस्विनीच्या हाताची शस्रक्रिया झाली आहे अशा चर्चा समोर येत आहेत. खरंच तेजूच्या हाताची सर्जरी झाली आहे का याबद्दल तिनं स्वत: माहिती दिली आहे. तेजस्विनीच्या हाताची शस्त्रक्रिया झाल्याच्या चर्चांमुळे अनेकांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली. अनेकांनी तिला सोशल मीडियावर मेसेज करून विचारपूस केली. चाहत्यांची काळजी लक्षात घेऊन तेस्विनीनं स्वत: याबद्दल सविस्तर पोस्ट लिहून माहिती दिली आहे. तेजस्विनीनं पोस्टमध्ये म्हटलंय, ‘माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो तुम्ही खूप मजेत असाल अशी मी अपेक्षा करते. माझ्या तब्येतीची विचारपूस करणारे अनेक संदेश मला तुमच्याकडून मिळाले. माझ्या बोटाची शस्त्रक्रिया झाल्याचा गैरसमज अनेकांना होत असल्याचे मला समजले. मुळात, तसं काहीही झालं नाही’. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: ‘तेजस्विनीला झालेली दुखापत साधी सुधी नाही’; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
तेजस्विनीनं पुढे म्हटलंय, ‘माझ्या हाताला किरकोळ फ्रॅक्चर झाले असून, ते काही आठवड्यात भरून निघेल. त्यामुळे शस्त्रक्रियेची गरज नाही असे माझ्या डॉक्टरांनी सांगितले. आता तीन आठवडे झाले असून बऱ्यापैकी सुधारणादेखील होत आहे. लवकरच एकदम तेजस्वी तेजस्विनी तुम्हाला परत एकदा दिसून येईल. तुमचं माझ्यावरच प्रेम असंच राहू द्या’.
तेजस्विनीच्या हाताला , हात फ्रॅक्चर झाला नाहीये. उजव्या हाताचं चौथ बोटाला बेटाकार्पलजवळ एक क्रॅक गेला आहे.हाताची जास्त हालचाल होऊ नये यासाठी प्लास्टर करण्यात आलं आहे. बिग बॉसच्या घरातील डॉक्टरांनी तेजस्विनीला 6 आठवडे हाताची काळजी घेण्याची आणि फ्रॅक्चर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तेजस्विनीला पुन्हा बिग बॉसमध्ये आणण्याची मागणी केली जात आहे.