• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Marathi च्या घरात भातावरून वाद; सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई भिडल्या

Bigg Boss Marathi च्या घरात भातावरून वाद; सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई भिडल्या

बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi ) घराच्या सध्या तृप्ती देसाई (Trupti Desai) कॅप्टन असल्याने त्या दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, सोनालीला ( sonali patil )कसला तरी राग आल्याने तिचा पारा भलताच चढला आहे आणि ती कुणाचंचं ऐकून घ्यायला तयार नाहीये.

 • Share this:
  मुंबई 19 ऑक्टोबर :  बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3 ) घरात आज सोनाली पाटील (sonali patil ) आणि तृप्ती देसाई (Trupti Desai)यांच्यात वाद होणार आहे. सोनालीचा पारा चढणार आहे. कारण काय तर भात कोणी वाफवावा ? सोनाली तिचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, तिला जे वाटतं ते सांगताना दिसणार आहे. पण, तृप्तीताईंचे म्हणणे आहे छोटी गोष्ट आहे वाढवण्यात काहीच अर्थ नाहीये. सोनालीचं म्हणण आहे माझी ड्युटी नाहीये तर मी का करायचे? आता हा वाद कुठवर गेला ? आजच्या भागामध्ये कळेलच. सोनालीचं म्हणण आहे, “मी तुमच्याशी वाद घालत नाहीये. मला जिथे गोष्टी पटत नाहीयेत, तिथे मला बोलणं गरजेचं आहे याचा अर्थ असा नाहीये... छोटीच गोष्ट आहे. छोट्याच गोष्टीला का इतकं मोठं केलं जात आहे ? हे तिथे पण तुम्ही बोलू शकता ना ? तुम्ही तिथे पण जाऊन सांगाना. तुमच्याशी वाद घ्यालायची माझी अजिबात इच्छा नाहीये. माझा आवाज चढतो आहे, तुम्हांला असं वाटेल मी तुमच्याशी भांडायला लागले आहे. प्लीझ जिथे मला खटकत आहे तिथे मला बोलू द्या. प्लीझ मला बोलू द्या. तुम्ही मला बोलूच देत नाहीये. सकाळची माझी ड्यूटी नाही मी करणार नाही. फेकून द्या. माझी बाजू आहे ना, तुम्ही प्रत्येकवेळा बोलायलाच हवं का ?
  तृप्ती ताई म्हणाल्या, “वाद नाहीये हा, छोटी गोष्ट आहे. दोन्ही बाजूने ताणल गेलं तर ते वाढणारच नाही का सोनाली. वाद नाही सामंजस्याची भूमिका घ्या. भांडायचा काय प्रश्न आहे यात. भात तुमच्याकडून कच्चा राहिला ना ? फेकून द्या म्हणजे ? हे चूक आहे. विनाकारण बडबड चालू आहे....... आणि हा वाद पुढे चालूच राहिला.  वाचा : संकर्षण कऱ्हाडे खरंच सोडणार 'तुझी माझी रेशीमगाठ' मालिका?अभिनेत्याने स्वतः दिलं उत्तर बघूया हा वाद पुढे कुठवर गेला ? तृप्ती देसाई कॅप्टन असल्याने त्या दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, सोनालीला कसला तरी राग आल्याने तिचा पारा भलताच चढला आहे आणि ती कुणाचंचं ऐकून घ्यायला तयार नाहीये. स्नेहाने देखील सांगितले विषय दुसरीकडे जातो आहे. तरी हा वाद थांबला नाही... बघूया शेवटी काय झाले ते आजच्या भागामध्ये.तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सीजन तिसरा.
  Published by:News18 Trending Desk
  First published: