• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • संकर्षण कऱ्हाडे खरंच सोडणार 'तुझी माझी रेशीमगाठ' मालिका?अभिनेत्याने स्वतः दिलं उत्तर

संकर्षण कऱ्हाडे खरंच सोडणार 'तुझी माझी रेशीमगाठ' मालिका?अभिनेत्याने स्वतः दिलं उत्तर

काही दिवसांपूर्वी झी मराठीवर 'तुझी माझी रेशीमगाठ' ही मालिका आपल्या भेटीला आली आहे. मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 19ऑक्टोबर- अभिनेता संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) सध्या 'तुझी माझी रेशीमगाठ'(Tuzi Mazi Reshimgath) मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याने ही मालिका सोडल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे तो खरंच मालिका सोडतोय कि ही फक्त अफवा आहे यावर चाहते संभ्रमात आहेत. मात्र आता ही शंका दूर झाली आहे. कारण अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं स्वतः यावर उत्तर दिलं आहे.
  काही दिवसांपूर्वी झी मराठीवर 'तुझी माझी रेशीमगाठ' ही मालिका आपल्या भेटीला आली आहे. मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने रसिक प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मालिकेत अभिनेता यश अर्थातच श्रेयश तळपदेच्या मित्राची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं साकारली आहे. या दोघांमध्ये फारच सुंदर बॉन्डिंग दाखवण्यात आलं आहे. यशचा मित्र समीर म्हणजेच संकर्षण प्रत्येक पाऊलावर एखाद्या सावलीप्रमाणे त्याची साथ देत असतो. दोघे भांडतात, चेष्टा मस्करी करतात, एकमेकांची खिल्ली उडवतात मात्र एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीत असं हे नातं रेखाटण्यात आलं आहे. या दोघांची मैत्री रसिक प्रेक्षकांना फारच आवडत आहे. मालिका अगदी उत्तम सुरु असताना गेली काही दिवस संकर्षण कऱ्हाडे ही मालिका सोडत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याने मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. नुकताच नाट्यगृहे सुरु होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यांनतर सर्वच कलाकरांकडून आनंद व्यक्त करण्यात आला होता. त्यांनतर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेसुद्धा आपल्या नाटकासाठी मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं समोर आलं होतं. नाटकाच्या प्रयोगामुळे त्याने मालिकेला रामराम केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या, मात्र अभिनेत्याकडून काहीही खुलासा झाला नव्हता त्यामुळे सर्वच चाहते संभ्रमात होते. मात्र आता ही शंका दूर झाली आहे. (हे वाचा:Majhi Tujhi Reshimgath मधील या प्रसिद्ध अभिनेत्याची मालिकेतून ... ) संकर्षण कऱ्हाडेनं स्वतः सोशल मीडियावरून चाहत्यांना याचं उत्तरं दिलं आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, 'मला न विचारता, माझ्याशी काहीही न बोलता मी मालिका सोडणार असल्याची अफवा काहींनी पसरवली आहे. मात्र हे साफ चुकीचं आहे. मी ही मालिका कधीच नाही सोडणार. माझं माझ्या कामावर आणि प्रेक्षकांच्या प्रेमावर प्रचंड विश्वास आहे. २३ तारखेपासून आमच्या नाटकाचा प्रयोग सुरु होत आहे. त्यामुळे माझी धावपळ होणार आहे. आम्हा कलाकारांना धावपळ हवी असते, आम्हाला तुमचं जास्तीत जास्त प्रेम हवं असत. त्यामुळे मी नाटकही करणार मालिकाही करणार आणि कविताही करणार'.असं म्हणत संकर्षणने या चर्चांना पूर्णविराम दिलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: