• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss marathi Season 3 live : बिग बॉसच्या घरात ह.भ.प. शिवलीला पाटील यांचं कीर्तन रंगणार!

Bigg Boss marathi Season 3 live : बिग बॉसच्या घरात ह.भ.प. शिवलीला पाटील यांचं कीर्तन रंगणार!

शिवलीला पाटील या बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये पाहायला मिळणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 सप्टेंबर : बिग बॉसचा यंदाचा तिसरा सीजन (Bigg Boss marathi Season 3 live) पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सायंकाळी 7 वाजल्यापासून कलर्स मराठीवर सुरू झालेल्या या कार्यक्रमात हळू हळू एक एक स्पर्धक समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्ती तृप्ती देसाई देखील यंदाच्या सीजनमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय सोशल मीडियावर ज्यांची कीर्तनं प्रसिद्ध आहेत, अशा तरुण कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटील देखील यंदाच्या सीजनमध्ये पाहायला मिळणार आहे. (bigg boss marathi 3 latest updates contestants kirtankar Shivlila Patil) कोण कोण आहे बिग बॉसच्या घरात.. जय दुधाणे, विकास पाटील, गायत्री दातार, सुरेखा कुडची, अविष्कार दारव्हेकर, स्नेहा वाघ, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष आनंद शिंदे, तृप्ती देसाई, शिवलीला बाळासाहेब पाटील, सोनाली पाटील या सदस्यांची एन्ट्री झाली आहे. 
  तरुण कीर्तनकार म्हणून शिवलीला पाटील या खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला पाटील यांची कीर्तन पाहिली जातात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील यांचं गाव. वेगळ्या वाटेनं वाटचाल करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या समाजप्रबोधन करत आहेत. कीर्तन या पुरुषप्रधान क्षेत्रात शिवलीला पाटील यांचं नाव प्रसिद्ध आहे. अनोख्या विनोदी शैलीत त्या कीर्तन करतात. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाची सोशल मीडियावर खूप चर्चा होते. हे ही वाचा-आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका; तृप्ती देसाईची बिग बॉसच्या घरात एन्ट्री शिवलीला पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील कीर्तनकार आहेत. घरातूनच त्यांना कीर्तनाचं बाळकडू मिळालं. वयाच्या पाचव्या वर्षी शिवलीला कीर्तन करू लागल्या. त्यानंतर त्यांनी अनेक गावांत कीर्तनं केली. तिच्या कीर्तनाला प्रतिसाद मिळू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा चाहता वर्ग बनवला. तिनं एक हजार कीर्तन केली.
  Published by:Meenal Gangurde
  First published: