• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Marathi 3 Live : आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका; तृप्ती देसाईची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

Bigg Boss Marathi 3 Live : आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका; तृप्ती देसाईची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

घरात आता खरा राडा पाहायला मिळणार आहे...

 • Share this:
  मुंबई, 19 सप्टेंबर : बिग बॉसचा यंदाचा तिसरा सीजन (Bigg Boss marathi Season 3 live) पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सायंकाळी 7 वाजल्यापासून कलर्स मराठीवर सुरू झालेल्या या कार्यक्रमात हळू हळू एक एक स्पर्धक समोर येत आहेत. अभिनेत्री सोनाली पाटील आणि अभिनेता विशाल निकल हे बिग बॉस 3 मराठीच्या (Sonali Patil and Vishal Nikam in the house of Bigg Boss) घरातील पहिले दोन सदस्य असणार आहेत. याशिवाय स्नेहा वाघ, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष आनंद शिंदे, अविष्कार दारव्हेकर यांची एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या घरात सामाजिक कार्यकर्ती आणि भूमाता ब्रिगेड संस्थेची संस्थापिका तृप्ती देसाई ( Social activist Tripti Desai ) पाहायला मिळणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने बिग बॉसच्या घरात राडा पाहायला मिळणार आहे. शनी शिंगरणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी मोठं आंदोलन छेडलं होतं. याची चर्चा राज्यभरात झाली होती.
  काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हेमांगी कवीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केला होता. त्यामध्ये ती पोळी लाटताना दिसत होती. मात्र या व्हिडीओवर तिला अनेक लाजिरवाण्या कमेंट्स आल्या होत्या. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी याच पोस्टच्या पार्शभूमीवर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी हेमांगीला तिखट शब्दात ‘शिर्डीच्या ड्रेसकोडसाठी आम्ही रान पेटवल तेव्हा या कुठे होत्या? पुढे त्यांनी म्हटलं आहे, इंदोरीकर महाराज जेव्हा महिलांविरुध्द बदनामीकारक वक्तव्य करत होते, तेव्हा या कुठे होत्या? असे प्रश्न केले आहेत. तसेच तृप्ती यांनी म्हटलं की, ‘आम्हीसुद्धा स्त्रियांच्या याच स्वातंत्र्यासाठी झगडतो, लढतो मात्र तेव्हा हे लोक का आम्हाला पाठींबा देत नाहीत. किंवा प्रविण तरडेसारखा अभिनेता का आम्हला पाठींबा दर्शवत नाही’. असंही त्यांनी म्हटलं आहे. हेमांगीच्या या पोस्टवरून समाजातील विविध माध्यमातून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत होत्या.
  Published by:Meenal Gangurde
  First published: