मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /स्नेहा भडकली मीनलवर! म्हणाली, 'Bigg Boss Marathi च्या घरात माझ्या एवढं कोणीच...' पाहा VIDEO

स्नेहा भडकली मीनलवर! म्हणाली, 'Bigg Boss Marathi च्या घरात माझ्या एवढं कोणीच...' पाहा VIDEO

पहिल्या आठवड्यात ओटिंग लाईन बंद असल्यामुळे सर्व स्पर्धक (Bigg Boss Marathi 3 Today Episode) या आठवड्यापर्यंत सुरक्षित झाले आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात जोडी की बेडी असा नॉमिनेशन टास्क दिला आहे. सध्या नॉंमिनेशन टास्कवरूनच बिग बॉस मराठीच्या घऱात मीनल शहा आणि स्नेहा वाघ यांच्यात जोरदार  खटके उडाले आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 सप्टेंबर ; छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ (Bigg Boss Marathi 3 )सध्या ‘बिग बॉस मराठी सिझन 3’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तिसऱ्या  सीजनमधील  दुसऱ्या आठवड्याला सुरूवात देखील झाली आहे. पहिल्या आठवड्यात ओटिंग लाईन बंद असल्यामुळे सर्व स्पर्धक (Bigg Boss Marathi 3 Today Episode) या आठवड्यापर्यंत सुरक्षित झाले आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात जोडी की बेडी असा नॉमिनेशन टास्क दिला आहे. सध्या नॉमिनेशन टास्कवरूनच बिग बॉस मराठीच्या घऱात मीनल शहा आणि स्नेहा वाघ यांच्यात जोरदार  खटके उडाले आहेत.

जोडी की बेडी हा नॉमिशेन टास्कसोबतच या आठवड्यात बिग बॉसने आणखी दोन जोड्यांना सर्वांच्या सहमताने नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला आहे. यावेळी बहुमताने शिवलीला, मीनल, अविष्कार, विशाल, विकास, जय आणि गायत्री हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यानंतर बिग बॉसने घऱातील सजस्यांना पुन्हा एखदा जे नॉमिनेट झालेले सदस्यांच्या जागी कोणाचे नाव घ्यायचे असेल तर स्पष्ट करण्यास सांगितले आहे. यानंतर मीनल शहा तिचे मत मांडताना दिसत आहे. यावेळी ती म्हणाली की, मी या घऱात स्नेहाला कधीच कोणासोबत मिक्स होताना पाहिलेले नाही. तिचा मला घऱात परफॉर्मन्स दिसलेलाच नाही.

वाचा : 'पवित्र रिश्ता 2' BTS VIDEO होतोय व्हायरल; असा होता अर्चना-मानवचा पहिला सीन

यावर स्नेहा देखील वेगळ्याच टोनमध्ये म्हणते की, मी काय आता डान्स करू काय? यावर मीनल देखील म्हणते मी तुमच्यासोबत नीट बोलत आहे. मीनल यावर म्हणते की मला फक्त एवढेच सांगायचे आहे की आपल्यात बोलणे होत नाही. यावर स्नेहा चिडून म्हणते की, आता मी माझ्या आयुष्यात काय आणि कसं कसं झालं आहे हे सगळं सांगत बसू का ? तुम्ही जर हाय आणि हॅलो केलं तर मीदेखील करते.

यानंतर मीनल देखील म्हणते की, स्नेहा कधीच तिच्या मतावर ठाम नसते. नेहमी ती जिकडे जास्त मतं असतात तिकडे ती झुकत असते. यावेळी स्नेहा चिडून उभे राहते आणि मोठ्याने म्हणते की, मी माझ्या मतावर जेवढी ठाम आहे तेवढं या घऱात कोणच मतावर ठाम नसल्याचे स्नेहा म्हणते. मी माझा निर्णय कधी बदलत नाही. यानंतर त्या दोघींच्यात वाद होतो. बिग बॉसने तर जोडी की बेडी हा टास्क सोपवला आहे मात्र या वादामुळे याचा शेवट नेमका कसा होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

First published:
top videos

    Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Tv serial, TV serials