मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss Marathi 3 मुळे 'या' अभिनेत्रीला मोठा फटका ; हातातून गेला पहिला सिनेमा

Bigg Boss Marathi 3 मुळे 'या' अभिनेत्रीला मोठा फटका ; हातातून गेला पहिला सिनेमा

बिग बॉसच्या घऱात जाण्याचा या मराठी अभिनेत्रीला मोठा फटका बसला आहे. तिच्या हातातून यामुळे  पहिला सिनेमा गेला आहे.

बिग बॉसच्या घऱात जाण्याचा या मराठी अभिनेत्रीला मोठा फटका बसला आहे. तिच्या हातातून यामुळे पहिला सिनेमा गेला आहे.

बिग बॉसच्या घऱात जाण्याचा या मराठी अभिनेत्रीला मोठा फटका बसला आहे. तिच्या हातातून यामुळे पहिला सिनेमा गेला आहे.

मुंबई , 16 ऑक्टोबर : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi 3 ) किंवा या शोमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अनेकांच्या करिअरला या शोने उभारी दिली आहे. बिग बॉस हा शो नाव तर देतोच पण प्रसिद्धी देखील देतो. त्यामुळे या शोमध्ये जाण्याची संधी नाकारणारे खूप कमीच आढळतात. त्याच्यप्रमाणे मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातारने (gayatri datar)देखील बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीजनमध्ये सहभागी होण्याचे ठरवले आणि ती सहभागी देखील झाली. सध्या गायत्रीच्या बिग बॉसमधील खेळाचे प्रेक्षकांकडून तर कौतुक होत आहे. मात्र बिग बॉस मराठीसाठी गायत्रीला खूप मोठा तोटा सहन करावा लागला आहे. या शोसाठी गायत्रीने एक मोठी संधी सोडली आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर गायत्री आता रुपेरी पडद्यावर झळकणार होती. मात्र बिग बॉसमुळे सिनेमात काम करण्याची मिळालेली ऑफर तिच्या हातून निसटल्याचे समजतंय.

बिग बॉस मराठीच्या घरात प्रेवश घेण्यापूर्वी “बाबू” या मराठी सिनेमाची गायत्री दातारला ऑफर मिळाली होती. या सिनेमात अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकित मोहन सोबत अभिनेत्री गायत्री दातार आणि रुचिरा जाधव दिसणार होत्या. मात्र गायत्री बिग बॉसच्या घरात असल्याने ती ह्या चित्रपटाचे शूटिंग करू शकत नाही. त्यामुळे बाबू चित्रपटात गायत्रीच्या जागी आता अभिनेत्री नेहा महाजन हिची वर्णी लागली आहे. त्यामुळे या सिनेमातून गायत्रीचा पत्ता कट झाला आहे. तरी देखील सध्या सगळीकडे गायत्रीच्या बिग बॉसमधील खेळाची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वीच बाबू या सिनेमाचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे .या सिनेमाचे नाव जाहीर झाले त्यावेळी गायत्री दातार, अंकित मोहन, रुचिरा जाधव यांनी हजेरी लावली होती. मात्र बिग बॉसमुळे गायत्रीला या सिनेमात काम करणे शक्य नसल्याने गायत्रीच्या जागी आता नेहा महाजन सिनेमात दिसणार आहे.

वाचा : The Big Picture: शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रणवीर होता नर्व्हस; दीपिकाने दिलं होत मोठं सरप्राईज

तुला पाहते रे मालिकेतून गायत्री दातार महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती.यानंतर गायत्री सर्वात लोकप्रिय असेला विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये सुद्धा दिसली. यामध्ये तिच्या अभिनयचे कौतुक झाले आणि आता गायत्री बिग बॉस मराठीचे घर देखील गाजवत आहे.

वाचा : बापरे! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अवस्था झाली भयंकर; PHOTO शेअर करत म्हणाली, 'माझ्यासाठी प्रार्थना करा'

सध्या बिग बॉस मराठीच्या घरात दोन ग्रुप पाहायला मिळत आहे. त्यापैकी एक ग्रुप गायत्री दातार व मीराचा आहे तर दुसरा ग्रुप हा विशाल निकम व सोनाली पाटील यांचा आहे. यातच आदिश वैद्यची घरात प्रवेश झाला आहे. त्यात बिग ब़ॉसने दिलेले टास्क यामुळे घरात सध्या राडा सुरू आहे. गायत्री देखील शोमध्ये टिकून राहण्यासाठी सर्व टास्क मन लावून करताना दिसते.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, TV serials