मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /The Big Picture: शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रणवीर होता नर्व्हस; दीपिकाने दिलं होत मोठं सरप्राईज

The Big Picture: शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रणवीर होता नर्व्हस; दीपिकाने दिलं होत मोठं सरप्राईज

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranvir Singh) पहिल्यांदाच छोट्या पडदयावर पदार्पण करणार आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranvir Singh) पहिल्यांदाच छोट्या पडदयावर पदार्पण करणार आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranvir Singh) पहिल्यांदाच छोट्या पडदयावर पदार्पण करणार आहे.

मुंबई, 16ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranvir Singh) पहिल्यांदाच छोट्या पडदयावर पदार्पण करणार आहे. 'द बिग पिक्चर' (The Big Picture) हा रिअॅलिटी शो आजपासून सुरू होत आहे. बॉलिवूडमधील 10 वर्षांच्या दमदार कामगिरीने रणवीर सिंगची मागणी प्रचंड वाढवली आहे. आज रात्री 8 वाजता या शो चं प्रीमियर होणार आहे, ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, रणवीर सिंह शो सुरू होण्यापूर्वी खूपच घाबरला होता. रणवीरची अस्वस्थता पती दीपिका पदुकोणने(Deepika Padukone) एका सरप्राईजसह नाहीशी केली होती. पाहूया नेमकं काय घडलं होतं.

बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत असणारं जोडपं म्हणजे रणवीर सिंह -दीपिका पादुकोण होय. सोशल मीडियावरही हे दोघे प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच चाहतेसुद्धा या दोघांची जाईल प्रचंड पसंत करतात. रणवीर सिंह पत्नी दीपिका पदुकोणची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाही. दोघांचे खास बॉन्डिंग पाहून त्यांना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानले जाते. कलाकार 'द बिग पिक्चर'च्या प्रारंभाबद्दल जितका उत्साहित होता, तितकाच तो अस्वस्थसुद्धा होता. रणवीरने सांगितले की दीपिकाला त्याची ही समस्या जाणवली होती.

(हे वाचा:83: अखेर प्रतीक्षा संपली, 83 यादिवशी होणार रिलीज; रणवीर सिंगने केली ... )

याबद्दल बोलताना रणवीरनं सांगितलं, 'दीपिका पादुकोणने 'द बिग पिक्चर'च्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी रणवीरसाठी फुले आणि स्वतः हाताने लिहिलेलं एक पत्र पाठवलं होतं. आणि ते पाहून मला फार छान वाटलं होतं. मला मोठा धीर मिळाला होता'. ते सरप्राईज माझ्यासाठी फार खास असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 16 ऑक्टोबरपासून कलर्स, वूट आणि जिओ टीव्हीवर दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता 'द बिग पिक्चर' दाखवला जाणार आहे.

(हे वाचा:HBD: चित्रपटासाठी हेमा मालिनी यांचं बदलण्यात आलं होतं नाव; मात्र अभिनेत्रीने....)

रणवीर सिंह ने अनेकवेळा सांगितले आहे की, दीपिका सुरुवातीपासूनच त्याच्यासाठी सपोर्ट सिस्टीम राहिली आहे. दीपिकाला आपलं क्रिएटिव्ह बाऊंसिंग बोर्ड म्हणून वर्णन करताना, त्याने म्हटलं की, त्याला त्याच्या बायकोकडून क्विझ शो होस्ट करण्यासाठी टिप्सही मिळाल्या होत्या. रणवीरने सांगितले की दीपिकाने त्याला क्विझ शो विषयी प्रश्न विचारले होते त्याचा फायदा त्याला मिळाला आहे.तसेच रणवीर सिंगने म्हटलं आहे, दीपिका ही त्याची सर्वात मोठी क्रिटिक आहे. म्हणूनच ती त्याला सर्वोत्तम काम करण्यास मदत करते.

First published:

Tags: Deepika padukone, Entertainment, Ranvir singh