पोस्टमध्ये वर्षा म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी माझा अपघात झाला. माझ्या पायाला आणि पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे, तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. हे वाचा - सैराट, फँड्रीनंतर नागराज मंजुळेंची 'घर बंदूक बिरयानी'ची ट्रीट; टिझर पाहिलात का? वर्षा दांदळे या मूळच्या अकोल्याच्या. लग्नानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. अभिनयाचा त्यांचा प्रवास खूपच उल्लेखनीय असाच आहे. संगीत शिक्षिकेची नोकरी करत असताना त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी अत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना ओळख देखील मिळाली. पुढे नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत त्यांनी लता काकूची भूमिका साकारली मग घाडगे आणि सूनमधील सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ झाल्या. स्वामी समर्थांच्या कृपा-सिंधू या मालिकेतील सुंदरा बाई या भूमिकेने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. शिवाय पाहिले न मी तुला मालिकेत उषा मावशी म्हणून गोड. प्रेमळ सासूचीही त्यांची भूमिका सर्वांना आवडली. याशिवाय वर्षा यांनी एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केलं आहे. हे वाचा -Bigg Boss 15 च्या जंगलात झाली भयंकर 'दंगल'! अनेक सदस्य जखमी, पाहा VIRAL VIDEO हा सर्व प्रवास चालू असताना त्यांच्यावर मोठे संकट ओढवलं. अपघातामुळे आणि गंभीर दुखापतीमुळे त्या अंथरूणाला खिळून आहेत. त्या लवकरच बऱ्या होतील अशी आशा आहे. चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.