जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अखेर कोरोनाने मला गाठलचं' ; 'Bigg Boss Marathi 3' च्या घरात धुमाकूळ घालणाऱ्या या स्पर्धकाला कोरोनाची लागण

'अखेर कोरोनाने मला गाठलचं' ; 'Bigg Boss Marathi 3' च्या घरात धुमाकूळ घालणाऱ्या या स्पर्धकाला कोरोनाची लागण

'अखेर कोरोनाने मला गाठलचं' ; 'Bigg Boss Marathi 3' च्या घरात धुमाकूळ घालणाऱ्या या स्पर्धकाला कोरोनाची लागण

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) एका स्पर्धकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक सेलेब्सना कोरोनाची लागण झाली आहे. देशासह राज्यात कोरोनाचा कहर माजला आहे. विशेष काळजी घेऊन देखील अनेक सेलेब्स व त्यांच्या घरच्या मंडळींना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आहे. बिग बॉस मराठीच्या  (Bigg Boss Marathi 3) एका स्पर्धकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉस मराठीच्या स्पर्धक राहिलेल्या तृप्ती देसाई **( social activist trupti desai )**यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की,अखेर “कोरोनाने” मला गाठलचं- माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी परंतु नियमांचे पालन मी करीत होते….जेव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही.माझी तब्येत व्यवस्थित आहे ,काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा. वाचा- मिस्टर & मिसेस मुख्यमंत्री पुन्हा येणार..; सुमी- समर या सिनेमात एकत्र दिसणार 2021 च्या बिग बॉस मराठीच्या सीजन तीनमध्ये त्या दिसल्या. त्यांच्या खेळाचे कौतुक झाले. घरातून बाहेर पडल्यानंतर देखील त्यांनी बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची भेट घेतली. यासोबत कधी मदत लागली तर एक फोन करा असं देखील त्यांनी सांगितलं होते.

जाहिरात

तृप्ती देसाई मूळ कोल्हापूरच्या आहेत पण त्यांचं कुटुंब नंतर पुण्यात स्थायिक झालं. पुण्याच्या SNDT महाविद्यालयातून त्यांनी होम सायन्सची पदवी घेतली. शनिशिंगणापूर पाठोपाठ तृप्ती देसाईंनी मुंबईचा हाजी अली दर्ग्यात, कोल्हापूरच्या महालक्ष्मी, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि कपालेश्वर मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलनं केली. त्यानंतर त्या चर्चेत आल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात