जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मिस्टर आणि मिसेस मुख्यमंत्री पुन्हा येणार..; सुमी- समर या सिनेमात पुन्हा एकत्र दिसणार

मिस्टर आणि मिसेस मुख्यमंत्री पुन्हा येणार..; सुमी- समर या सिनेमात पुन्हा एकत्र दिसणार

मिस्टर आणि मिसेस मुख्यमंत्री पुन्हा येणार..; सुमी- समर या सिनेमात पुन्हा एकत्र दिसणार

छोट्या पडद्यावरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ (Mrs Mukhyamantri )ही मालिका संपली असली तरी या मालिकेतील सुमी आणि समरच्या जोडीला प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. आता ही जोडी पुन्हा येणार आहे तेही मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी- छोट्या पडद्यावरील ‘मिसेस मुख्यमंत्री’   **(Mrs Mukhyamantri )**ही मालिका संपली असली तरी या मालिकेतील सुमी आणि समरच्या जोडीला प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. या जोडीला प्रेक्षक आजही मिस करतात. मालिकेच सुमीची भूमिका अभिनेत्री अमृता धोंगडे   (Amruta Dhongade) हिने साकारली होती. तर समरची भूमिका तेजस बर्वे ( Tejas Barve ) याने साकारली होती. आता टीव्ही जगतातील ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. तेही एका सिनेमात, त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या जोडीला पुन्हा एकत्र पाहता येणार आहे.अमृता आणि तेजस यांच्या सिनेमाचे नाव दिशाभूल असं आहे. एका मराठी पोर्टलने याबद्दल माहिती दिली आहे. अमृता आणि तेजस यांच्याकडून याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. तसेच हा सिनेमा कोणाच आहे व याचा निर्माता कोण आहे व कशावर आधारित आहे याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे काही सुंदर फोटो तसेट डान्स व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अभिनयाच्या क्षेत्रात अमृताने ‘मिथुन’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आहे. हा अमृताचा पहिला चित्रपट असून १३ जुलै 2018 ला प्रदर्शित झाला. झी मराठी वाहिनीवर मिसेस मुख्यमंत्री या मालिकाद्वारे अमृता धोंगडे घराघरामध्ये पोहोचली. अमृता उत्तम डान्स करते. तिने कथ्थकमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. वाचा- बर्थ डे दिवशी Hrithik Roshanने रिलीज केला विक्रम वेधाचा Fist Look तेजसनं ‘जिंदगी नॉट आउट’ या मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेत त्याने सचिन देसाईची भूमिका साकारली आहे.तेजस बर्वेचा जन्म पुण्यामध्ये झाला. पुण्याच्या एसपी कॉलेजमधून त्याने कॉमर्सची पदवी घेतली आहे. तेसजसने क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीवर आधारित ‘चॅलेंज’ या ऐतिहासिक नाटकामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. मात्र मिसेस मुख्यमंत्री या मालिकाद्वारे या मालिकेतून तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला.

जाहिरात

आता ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे तेही मोठ्या पडद्यावर. त्यामुळे प्रेक्षकांना यांना एकत्र पाहण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात