मुंबई, 04 जुलै- सध्या बिग बॉस मराठीच्या घरात अतिथी देवो भव: हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. या टास्कसाठी घरामध्ये काही खास पाहुणेही आले आहेत. हे पाहुणे म्हणजे पहिल्या पर्वातील सदस्य पुष्कर, सई, शर्मिष्ठा आणि स्मिता. आता हे पाहुणे घरातील सदस्यांन वेगवेगळे टास्क देणार आहेत. हे सदस्य दिलेले टास्क चतुराईने कसे पूर्ण करतील आणि स्टार मिळवतील हे आज कळेलच. याशिवाय घरामध्ये आलेले गेस्ट हे पहिल्या पर्वातील अतिशय हुशार सदस्य आहेत. प्रत्येक टास्क कुशलतेने आणि बुद्धीचा वापर करून जिंकलेले आहेत. हेच सदस्य काही स्ट्रॅटेजी आज टास्क दरम्यान वापरणार आहेत. आज पुष्कर साखर, चहा पावडर आणि मिठाची बरणी लपवताना दिसणार आहे. आता अचानक या बरण्या कुठे गेल्या असा प्रश्न सदस्यांना पडणं अगदी स्वाभाविक आहे. घरातील सदस्य एकमेकांच्या टीमना दोषी ठरवून तुम्हीच या बरण्या लपवल्या असं देखील म्हणू शकतील.. बरण्या यांना मिळणार का आणि सदस्य बरण्या कशा मिळवतील हे आजच्या भागात कळेलच. आजच्या भागामध्ये अजून एक गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे, सई बिग बॉस मराठी सिझन २ च्या दुसऱ्या वाइल्ड कार्ड स्पर्धक आहेत असे बिग बॉस जाहीर करणार आहेत.. हे ऐकून घरातील सदस्य आणि सई खूप खुश आहेत. सईने बिग बॉसचे आभार देखील मानले. आजच्या भागात अजून पुढे काय होणार हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
प्रेग्नंट समीरा रेड्डीने नवव्या महिन्यात पाण्यात केलं फोटोशूट
दरम्यान, पाहुणे म्हणून आलेल्यांनी सदस्यांची बरीच कानउघडणी केली आणि त्यांना त्यांच्या चुकादेखील दाखवून दिल्या. याच बरोबर त्यांना मोलाचे सल्ले देखील दिले. पुष्करचे म्हणणे होते की त्याला घरात यायला भीती वाटत होती. सईने यावेळी सदस्यांना प्रश्न विचारला की, ‘या शोबद्दल, वाहिनीबद्द कोणाला आदर वाटतो. तसेच आज या शोमध्ये आहात ही खूप मोठी गोष्ट आहे असं किती जणांना वाटतं.’ या प्रश्नावर सगळ्याच सदस्यांनी होकार दिला. पण सईचे म्हणणे होते आम्हांला तस काहीच दिसत नाही.
संजय दत्तच्या मुलीच्या बॉयफ्रेंडचं निधन, त्रिशाला दत्तने शेअर केली भावुक पोस्ट
याच गोष्टीला धरून शर्मिष्ठा म्हणाली की, ती एका गोष्टीवरून खूप दुखावली गेली. नेहाने हे घर सायको आणि विचित्र आहे असं म्हटलं होतं. मात्र ते तसं नाहीये. घर हे घरात राहणाऱ्या लोकांमुळे बनत. तर तुम्ही सायको असाल. या घराने आम्हांला सगळ्यांनाच खूप काही दिले आहे. त्यामुळे या वास्तूविषयी, या घराविषयी आणि बिग बॉस विषयी आम्ही कधीच ऐकून घेणार नाही. इथेपण नाही आणि बाहेर पण नाही.
सनी लिओनीला झाला हा आजार, म्हणून सिनेमाच्या सेटवर नेहमी पोहोचते उशिरा
शर्मिष्ठा पुढे म्हणाली की, बिग बॉस हा गेम फक्त टास्कपुरता मर्यादित नसून इथे नाती जोडली जातात. जी नाती आम्ही या घरामधून बाहेर गेल्यावरसुध्दा जपत आहोत. स्मिता आमच्या टीममध्ये नव्हती तरी देखील आम्ही भेटतो, गप्पा मरतो. इथे मात्र तसं अजिबात दिसत नाही. नाती नाही, माणुसकी नाही नुसते टास्क खेळता तुम्ही. यावर स्मिता म्हणाली, मी यांच्या ग्रुपमध्ये नव्हते तरीदेखील मी आज यांच्यासोबत इकडे आले. आम्ही देखील राडे केले, भांडलो, पण मला शंका आहे तुम्ही बाहेर गेल्यावर एकमेकांचे चेहरे पाहाल तरी का? SPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







