संजय दत्तच्या मुलीच्या बॉयफ्रेंडचं निधन, त्रिशाला दत्तने शेअर केली भावुक पोस्ट

संजय दत्तच्या मुलीच्या बॉयफ्रेंडचं निधन, त्रिशाला दत्तने शेअर केली भावुक पोस्ट

माझं तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. जोवर आपण दुसऱ्यांदा भेटत नाही तोवर मी तुला नेहमीच मिस करेन.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 जुलै- संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तने तिच्या इन्स्टाग्रामवर प्रियकराच्या मृत्यूची पोस्ट शेअर केली. मुळचा इटालियन असलेल्या तिच्या प्रियकराबद्दल फारसं कळू शकलेलं नाही. मात्र त्याचा ३ जुलै रोजी मृत्यू झाला. प्रियकराच्या आकस्मित मृत्यूमुळे त्रिशाला दुःखात बुडाली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रियकराला श्रद्धांजली वाहिली.

प्रियकरासोबतचा फोटो शेअर करत त्रिशाला म्हणाली की, ‘माझ्यावर प्रेम करण्यासाठी, माझी काळजी घेण्यासाठी आणि माझी सुरक्षा घेण्यासाठी तुझे खूप आभार. मी पूर्णपणे उद्धस्त झाली आहे. तू मला आयुष्यात एवढं आनंदी ठेवलंस जेवढी मी कधीच नव्हते. तुला भेटल्यानंतर मी जगातली सर्वात नशीबवान मुलगी झाली होती. तू नेहमीच माझ्यात जिवंत राहशील. माझं तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. जोवर आपण दुसऱ्यांदा भेटत नाही तोवर मी तुला नेहमीच मिस करेन.’

‘तारक मेहता’ मध्ये दिसणार नवीन दयाबेन, दिशा वकानीला या अभिनेत्रीने केले रिप्लेस

दरम्यान, त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. त्रिशालाने न्यूयॉर्कमधील जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनलमधून लॉमध्ये पदवी घेतली आहे. यानंतर तिने न्यूयॉर्क येथील हॉफ्स्ट्रा यूनिव्हर्सिटीमधून मास्टर्सची डिग्री घेतली. त्रिशालाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. २०१४ मध्ये तिने ड्रीम ड्रेसेस एक्सटेंशन हा प्रोजेक्ट सुरू केला. त्रिशाला फक्त आठ वर्षांची असताना १९९६ मध्ये ऋचाचा ब्रेन ट्यूमरने मृत्यू झाला. आईच्या निधनानंतर त्रिशाला अमेरिकेत मावशीसोबचत राहू लागली. आता ती ३१ वर्षांची आहे.

सनी लिओनीला झाला हा आजार, म्हणून सिनेमाच्या सेटवर नेहमी पोहोचते उशिरा

SPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 03:17 PM IST

ताज्या बातम्या