मुंबई, 24 जुलै : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही नाती नक्की कशी आहेत. ती कधी बदलतील हे सांगता येत नाही. जस रुपाली आणि वीणाचं नात. त्यांच्या मैत्रीमध्ये काही गैरसमज आणि छोट्या छोट्या कारणामुळे आता दुरावा आला आहे. पण परत जुळू देखील शकेल, ही शक्यता नाकारता येत नाही. शिवानीच्या घरामधून जाण्याने नेहा खूप दुखावली होती पण तिच्या परत येण्याने ती तितकीच आनंदी देखील झाली होती. तिच्यासोबत माधवला देखील आनंद झाला होता. शिवानीच्या परत येण्याने जणू माधव आणि नेहाला त्यांची ताकद परत मिळाली असे वाटत होते. पण आता मात्र त्या मैत्रीमध्ये कुठेतरी दुरावा आला आहे असे दिसू लागले आहे. घरामध्ये राहताना एक दुसऱ्याला समजून घेणे खूप महत्वाचे असते आणि या घरामध्ये प्रत्येक वळणावर नात्याची कसोटी लागते. तब्बल 11 वर्षांनी महेश मांजरेकर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना देणार ‘धक्का’ शिवानी आज माधवला सांगताना दिसणार आहे, आता मी नेहाशी बोलणार नाही. कारण तिला मस्ती कळत नाही, तिने केलेली मस्ती आपण सहन करायची आणि आपण केलेली मस्ती तिला सहन होत नाही. यावर माधवने देखील दुजोरा दिला. तिने पुढे असे देखील सांगितले, नेहा आणि माझी मैत्री या घराच्या बाहेर . तिची माझी मैत्री टिकायची असेल तर या घराबाहेर टिकेल पण आता मला तिच्याशी अजिबात बोलायचे नाही. एकही वाक्य मी तिच्याशी यापुढे बोलणार नाहीये. माधवचे म्हणणे आहे, नाही बोलणार असे का करायचे, मैत्री नको करूस, ओव्हर फ्रेंडली नको होऊस. रुपाली करते तस कर. बाबो ! ऑर्डर केलेल्या दोन केळ्यांचं एवढं बिल; हॉटेल जोमात अभिनेता कोमात
याशिवाय आज घरामध्ये ‘सात बारा’ हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे.टीम A आणि टीम B अशा दोन टीम्स मध्ये हे कार्य पार पडेल. अभिजीत, विणा, हीना, आरोह आणि किशोरी एका टीममध्ये तर शिवानी, नेहा, रुपाली, शिव आणि माधव दुसऱ्या टीम मध्ये असणार आहेत. आता बघूया या कार्यामध्ये कोण बाजी मारणार? आणि कोणती टीम हरणार? पण टास्कमध्ये असे काय झाले कि बिग बॉस यांनी घोषणा केली, हे कार्य याच ठिकाणी थांबवण्यात येत आहे. हे पाहणं रंजक असणार आहे. Sacred Games मधल्या या अभिनेत्रीला एअरपोर्टवर रोखलं, ‘या’ कारणासाठी केली कसून चौकशी =========================================================== VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला, सखल भागांत साचलं पाणी