मुंबई, 05 ऑक्टोबर ; सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीची (Bigg Boss Marathi 3) चर्चा सुरू आहे. बिग बॉस मराठीच्या घऱाच दररोज नवीन समीकरण पाहण्यास मिळते. कधी भांडण तरी कधी प्रेम याचा मिलापच म्हणजे बिग बॉस मराठीचे घर आहे. सध्या या सीजमधील मोस्ट हॅण्डसम बंदा जय दुधाणे **(Jay Dudhane )**देखील या घरात एका व्यक्तीच्या प्रेमात पडला आहे. विशेष म्हणजे त्याने या व्यक्तीला फुले देऊन प्रेम देखील व्यक्त केले आहे. ही व्यक्ती कोण आणि तिने हे प्रपोजल स्विकारले की नाही..या सर्व प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओत मिळत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, सुरेखा कुडची , स्नेहा वाघ उत्कर्ष शिंदे ही घरातील मंडळी जेवणाच्या टेबलवर बसली आहेत. मध्येच जय दुधाणे येतो आणि म्हणतो ही बाटली आहे ना त्याच्यावरचे हे मी बनवले आहे. त्यावर सगळे म्हणतात हे तू कोणाल देणार आहेस. यावर सगळे म्हणतात हे तू कोणाला देणार आहेस. यावर लगेच स्नेहा वाघ म्हणते वन अॅण्ड ओनली वन …तर जय म्हणतो जिसने आज ब्लू रंगाचा ड्रेस घातला आहे. यावर उत्कर्ष देखील सुरेखा यांच्याकडे पाहत तुच गं.. असं म्हणतो. जय देखील फुले घेऊन लगेच सुरेखा यांना प्रपोज करतो. वाचा : Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात दणक्यात साजरा झाला स्नेहाचा वाढदिवस; मिळालं खास गिफ्ट यावर सुरेखा देखील त्याचे प्रपोजल स्विकारतात आणि फुल चेष्म्याजवळ माळतात. तेव्हा त्या जयला मजेत म्हणतात पडू नको बाळा अन् जयच्या डोक्यावरून हात फिरवतात. ही सगळी गंमत आहे. यावर घरातील मंडळी देखील हासू लागतात. पण काही असु दे यानिमित्त तरी बिग बॉस मराठीच्या घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहे.
जय दुधाणेच्या या प्रपोजलवरून नेटकऱ्यांनी मात्र त्याची खिल्ली उडवली आहे. जय या खेळासाठी योग्य नाही तर काहींनी जय धूर्त कोल्हा असल्याचे म्हणत त्याच्या घरातील वागण्यावर टीका केली आहे. जय हे फक्त खेळासाठी करत असल्याचा आरोप देखील काहींनी केला आहे. घरात येण्यापूर्वी जयने या खेळासाठी कोणासोबत कनेक्शन बनवावे लागले तर वेळ पडल्यास तेही बनवेल असे सांगितले होते. वाचा : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात विकी कौशलच्या भावाला करतेय डेट? कोण आहे जय दुधाणे ? जय दुधाणे याने बिग बॉस मराठी शो करण्यापूर्वी हिंदी रिअॅलिटी स्प्लिट्सविला हा शो देखील केला आहे. या कार्यक्रमातून त्याला प्रसिद्धी मिळाली. जय एक उद्योगपती आहे व त्याला महागड्या चारचाकी गाडींचा शोक आहे. यासोबतच त्याला फिटनेसची देखील आवड आहे. जयला बिग बॉसच्या घरात जाण्याआधी त्याला, तू घऱात जाण्यासाठी काय तयारी केली आहेस आणि त्याची खेळासाठी काय स्ट्रॅटेजी आहे असे माध्यम प्रतिनिधींकडून विचारण्यात आले होते. यावर जय म्हणाला होता की, ’’ जर गेमसाठी कनेक्शन बनवायची गरज पडली तर तेही करेल’’ असे म्हटले होते.