मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात विकी कौशलच्या भावाला करतेय डेट?

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात विकी कौशलच्या भावाला करतेय डेट?

सध्या भाऊ विकी कौशलप्रमाणेच त्याचा लहान भाऊ याच्या अफेअरची देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगेलेली आहे. सध्या सनीचे नाव मराठमोळी अभिनेत्री शर्वरी  वाघ हिच्याशी जोडले जात आहे. हे नाव महाराष्ट्रातील जनतेच्या ओळखीचे आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 4 ऑक्टोबर ; बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं कपल म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे आहे. या दोघांच्या अफेरची तर कधी साखरपुड्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली असते. सध्या भाऊ विकी कौशलप्रमाणेच त्याचा लहान भाऊ याच्या अफेअरची देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगेलेली आहे. सध्या सनीचे (Sunny Kaushal),  नाव मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) हिच्याशी जोडले जात आहे. हे नाव महाराष्ट्रातील जनतेच्या ओळखीचे आहे. कारण शर्वरी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची (Manohar Joshi)नात आहे.

शर्वरी आणि सनीने 'द फरगॉटन आर्मी' मध्ये एकत्र काम केले आहे. तेव्हा पासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. या दोघांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शर्वरी अभिनय क्षेत्रात कार्यरत असली तरी तिची कौंटुंबिक पार्श्वभूमी काहीशी राजकारणाशी निगडीत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची शर्वरी नात आहे.

वाचा : Big Boss Marathi 3: भली मोठी पोस्ट लिहीत; आदर्श शिंदेने घेतली चावडीचीच शाळा

शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध उद्योगपती आहेत. शर्वरी लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'बंटी और बबली'च्या सीक्वलमध्ये ती मुख्य भूमिका दिसणार आहे.यामध्ये तिच्यासोबत 'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिका साकारणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)

शर्वरीने यापूर्वी 'प्यार का पंचनामा २', 'बाजीराव मस्तानी' आणि 'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.शर्वरीने बालपणी नाट्यकार्यशाळांमध्ये भाग घेतला असून शाळेत असताना तिने बऱ्याच नाटकांमध्ये काम देखील केलं आहे.

सनी कौशलचा 28 सप्टेंबरला होता वाढदिवस 

विकीचा भाऊ सनी कौशलचा 28 सप्टेंबरला  वाढदिवस होता.  सनीच्या वाढदिवसानिमित्ताने कतरिनाने खास शुभेच्छा दिल्या होत्या. कतरिनाने तिच्या इन्टास्टोरीला सनीचा एक फोटो शेअर केला होता.  यात “हॅपी बर्थ डे सनी, मी देवाकडे प्रार्थना करेन की तुझे सर्व दिवस प्रेम आणि आनंदाचे जावो” असं तिने म्हंटलं होते. तर अभिनेता विकी कौशलने देखील इन्स्टास्टोरीला भावाचा एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ” हॅपी बर्थडे मेरे जिगर के तुकडे” असं कॅप्शन विकीने दिलं होते.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Marathi entertainment