• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Marathi:नॉमिनेशन टास्कनंतर घरात रंगणार चिऊताईचा खेळ; पाहा कोण मारणार बाजी

Bigg Boss Marathi:नॉमिनेशन टास्कनंतर घरात रंगणार चिऊताईचा खेळ; पाहा कोण मारणार बाजी

नॉमिनेशन टास्कनंतर (New Task) बिग बॉसच्या घरात 'चिऊ ताई चिऊ ताई दार उघड' हा मजेशीर खेळ रंगणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर- मनोरंजनाचा फुल ऑन धमाका असं 'बिग बॉस'ला म्हटलं जातं. कोरोना महामारीमुळे 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi)तब्बल दोन वर्षे लांबणीवर पडलं होतं. त्यामुळे चाहत्यांना मोठी प्रतीक्षा लागून होती. अखेर बिग बॉस मराठीचा तिसरा पर्व (Season 3) आपल्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवसापासून घरात धमाकेदार प्रसंग आणि स्पर्धकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. नॉमिनेशन टास्कनंतर (New Task) बिग बॉसच्या घरात 'चिऊ ताई चिऊ ताई दार उघड' हा मजेशीर खेळ रंगणार आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच स्पर्धकांची परीक्षा सुरु होते. पहिल्याच दिवशीपासून या स्पर्धकांना घरात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी विविध टास्क पार करावे लागतात. नुकताच घरामध्ये पहिला नॉमिनेशन टास्क पार पडला होता. तर आज अवघ्या दुसऱ्या दिवशी बिग बॉसनी स्पर्धकांना एक नवा टास्क देऊ केला आहे. हा टास्क खूपच मजेशीर असणार आहे. या टास्कच नाव ऐकून सर्वानाच आपल्या बालपणीची आठवण होईल. कारण या टास्कचं नाव आहे 'चिऊ ताई चिऊ ताई दार उघड'. हा टास्क नेमका काय आहे? किंवा नेमकं कोणतं काम यामध्ये करायचं आहे हे आपल्यला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र हा टास्क पाहताना खूपच मजेशीर आणि इंटरेस्टिंग वाटत आहे. (हे वाचा:Bigg Boss Marathi: मीरा आणि स्नेहामध्ये जेवणावरून तुफान राडा; तर दुसरीकडे सोनाली) नुकताच बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो आपल्या समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांचीच उत्कंठा वाढवली आहे. या प्रोमोमध्ये सर्व पुरुष मंडळी घाबरतील सर्व महिलांजवळ जाऊन आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महिला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेत आहेत. प्रोमोमध्ये अविष्कार मीराला सांगत आहे, 'आम्ही तुमची सेवा करू इच्छितो' यावर मीरा म्हणत आहे , 'तुम्ही तर माझं ऐकतच नाही' तर घरातील इतर पुरुष स्पर्धक विशाल, जय, विकास, दादूस सर्वजण महिलांना त्यांची सेवा करण्याचं आश्वासन देत आहेत. त्यामुळे हा टास्क प्रत्यक्षात टीव्हीवर पाहताना मोठी मज्जा येणार आहे. यात काही शंका नाही. (हे वाचा:Bigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप) 'बिग बॉस मराठी' तिसऱ्या पर्वाचा हा तिसरा दिवस आहे. आणि ग्रँड प्रीमियरमध्येच होस्ट महेश मांजरेकर यांनी सांगितलं होतं की हा पहिला आठवडा महिलांच्या नावावर असणारा आहे. त्यामुळे महिलांना विशेष हक्क असणार आहेत. तर पुरुष स्पर्धक हे त्यांचे सेवक असणार आहेत. महिला स्पर्धकांनी फक्त त्यांच्या सेवकांना मार्गदर्शन करायचं आणि बाकी सर्व काम पुरुष सेवकाने पार पाडायचं असं सांगण्यात आलं आहे. तसेच पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांमध्ये जबरदस्त वादावादी होताना दिसून येत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: