• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप

Bigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप

महाराष्ट्राचं मनोरंजन अनलॉक करत नुकताच 'बिग बॉस' (Bigg Boss Marathi) मराठीच्या सीजन ३ (Season 3) ला सुरुवात झाली आहे. १९ तारखेला ग्रँड प्रीमियरमध्ये तब्बल १५ कलाकारांनी एकूण १०० दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर- महाराष्ट्राचं मनोरंजन अनलॉक करत नुकताच 'बिग बॉस' (Bigg Boss Marathi) मराठीच्या सीजन ३ (Season 3) ला सुरुवात झाली आहे. १९ तारखेला ग्रँड प्रीमियरमध्ये तब्बल १५ कलाकारांनी एकूण १०० दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. त्यांनतर पहिल्याच दिवशी घरामध्ये जय दुधाने(Jay Dudhane) आणि मीरा जग्गनाथमध्ये(Meera Jagannath) तुफान वादावादी पाहायला मिळाली.
  सध्या बिग बॉसची जोरदार चर्चा सुरु आहे. 'बिग बॉस मराठी' महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आपल्या भेटीला आला आहे. गेल्या २ सीजनप्रमाणे हा सीजनसुद्धा तितकाच धमाकेदार असणार असं सर्वांचंच मत आहे. 'बिग बॉस मराठी' सीजन ३ ची घोषणा झाल्यापासूनच घरामध्ये कोण कोण स्पर्धक असणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली होती. ग्रँड प्रीमियरमधून १०० दिवसांसाठी आपलं मनोरंज करणारे चेहरे कोण आहेत हे आपल्या सर्वांच्या समोर आलं आहे. आपले लाडके कलाकार बिग बॉसच्या घरात आल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. मात्र पहिल्याच दिवशी घरामध्ये 'स्पिलिट्सविला' फेम स्पर्धक जय दुधाने आणि 'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम मीरा जग्गनाथमध्ये जोराचा वाद पाहायला मिळला. घरात प्रवेश केल्यानंतर आठवड्यासाठी सर्वांनाच वेगवगेळे अधिकार देण्यात आले आहेत. या आठवड्यासाठी मीराला बेडरूमचा अधिकार देण्यात आला आहे. बेडरूमची स्वछता, बेडरूमचे हक्क मीराकडे आहेत. त्यामुळे ती सर्वांना स्वतःचं साहित्य जागेवर ठेवण्याचा आदेश देत होती. अशातच जय दुधानेचा टॉवेल त्याच्या बेडवर असलेला मीराला दिसून आला. यावेळी मीराने त्याला बोलावून तो ओला टॉवेल उचलून ठेवण्यास सांगितला अन्यथा बाथरूममध्ये न्हेऊन टाकण्यात येईल असं तिनं बजावलं. (हे वाच:Bigg Boss Marathi 3: जय दुधाणे म्हणतो, गेमसाठी कनेक्शन बनवायची गरज पडली तर...) जयने टॉवेल तर उचलला मात्र त्यांनतर मीराच असं म्हणणं होतं कि त्याने हातवाऱ्याने मीराला बिनडोक म्हटलं. या कारणावरून मीरा आणि जयमध्ये जोरात वादावादी सुरु झाली. यावेळी घरातील इतर सदस्यांनि मध्यस्थी करून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र जयच म्हणणं होतं, की त्याने अजून अंघोळच केली नाहीय तर टॉवेल ओला कसा असेल आणि अंघोळ करायच्या आधी मी तो टॉवेल बाथरूम एरियात का टाकून देऊ. यावर इतर सदस्यांनी त्याला शांत करत हा वाद इथेच मिटवला. मात्र शोच्या पहिल्याच दिवशी घरात मोठा धमाका पाहायला मिळाला. यावरूनच पुढचे १०० दिवस किती धमाकेदार असणार आहेत याचा अंदाज सर्वांनाच आला आहे. (हे वाच:Bigg Boss marathi 3: Real मध्ये घटस्फोट, Reality Show साठी आता एकाच घरात राहणार) घरातील पहिला आठवडा महिलांच्या नावावर करण्यात आला आहे. अर्थातच सुरुवातीलाच घरात महिला राज्य दिसून येणार आहे. तर पुरुष स्पर्धक यांना सेवक म्हणून सहकार्य करणार आहेत. आत्ता कोण कोणाला कशी मदत करणार कि शोमध्ये रोज एक राडा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: