मुंबई, 22 जुलै : Bigg Boss Marathi च्या घरामध्ये सदस्य बराच काळ एकत्र असल्याने त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते तयार होते. जे बऱ्याचदा घराबाहेर पडल्यावर देखील तसेच रहाते. असेच नाते विणा आणि शिवमध्ये देखील तयार झाले आहे. त्यांच्यातील मैत्री घरातील सदस्य आणि प्रेक्षकांपासून काही लपलेली नाही. शिव विणासाठी कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतो. मर्डर मिस्ट्री हा टास्क करण्यास नकार दिला कारण, त्यामध्ये विणाचा टॉप नष्ट करायचा होता. यावरून विकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकरांनी शिवला खडे बोल सुनावले. तर अभिजीत केळकरने देखील त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.कधी कधी विणाला मदत करण्याच्या प्रयत्नात विणाचेच नुकसान होईल असे देखील सांगितले. कारण असे झाल्यास ती शिववर अवलंबून आहे असे दिसते. तर शिवचे खेळण्यावर लक्ष कमी झाले आहे असे प्रेक्षकांना देखील दिसत आहे असे म्हणणे पडले. शिवने महेश मांजरेकरांना शब्द दिला कि, या आठवड्यापासून त्याच्यामध्ये बदल नक्कीच दिसेल. अभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण
याच विषयावरून शिव आणि विणामध्ये आज चर्चा रंगणार आहे. शिवचे म्हणणे आहे, महेश मांजरेकरांना असे वाटते आहे कि, आपण एकमेकांच्या मध्ये येतो आहे आणि आपण त्या गोष्टीवर आता लक्ष देऊ. पण त्याचा अर्थ असा नाही कि आपण बोलायचं नाही. एक तर आपण जसे बोलतो आहे तसेच बोलू फक्त लक्ष देऊ कुठे काय करायचे आहे. पण जस होतं तसंच ठेऊ आणि तसं नाहीतर पूर्ण बंद याच्यासाठी जर मी तुझ्याकडे आलो आणि खोट हसलो तर ते नाटकी बोलणं होईल, ते मी नाही करू शकत. तुझ्याशी नाही बोललो तर मी कमजोर पडेन असे मला वाटते. सरांनी जे सांगितलं ते आपण सकारात्मक पद्धतीने घेऊया, चुका बरोबर करु, टास्क मध्ये लक्ष देऊ, आणि आपण टास्कच्या वेळेस एकमेकांच्या मध्ये नाही येणार याची काळजी घेऊ. गरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप बिग बॉस मराठीध्ये कालच्या भागामध्ये वैशाली म्हाडे घराच्या बाहेर पडल्याने अभिजीत, शिव, विणा यांना वाईट वाटले आहे. आज घरामध्ये “हल्ला बोल” हे कॅप्टनसी टास्क रंगणार आहे.हे कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वे मध्ये रंगणार आहे. आता या आठवड्यामध्ये शिवानी कि अभिजीत कोणाला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. … म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो =============================================== भरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO