गरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप

गरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप

या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीनं सोशल मीडियाचा आधार घेत स्वतःसोबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जुलै : पाकिस्तानचा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक मोहसिन अब्बास हैदर त्याच्या पत्नीनं मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. मोहसिनची पत्नी फातिमा सोहेलनं तिच्यासोबत घडलेली सर्व हकीगत सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडली आहे. मोहसिननं तिच्यावर केलेल्या अत्याचारांबाबत तिनंआपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिच्या पतीनं तिला गरोदर असताना कशाप्रकारे मारहाण केली याविषयी फातिमानं तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

फातिमानं तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं ‘अत्याचार सहन करणं गुन्हा आहे.’ त्यानंतर तिनं तिच्यासोबत घडलेल्या सर्व घटना या पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. तिनं लिहिलं, ‘26 नोव्हेंबर 2018 ला मी मोहसिन मला फसवत असल्याचं रंगेहाथ पकडलं होतं. मात्र त्यावेळी त्यानं यावर पश्चाताप न करता उलट मलाच मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी मी गरोदर होते.’ फातिमाच्या फेसबुक पोस्ट नुसार मोहसिननं तिचे केस खेचले, तिला जमिनीवर आपटलं. तसेच लाथांनीही मारहाण केली. त्यानंतर मला एका भिंतीवर आपटलं आणि तो निघून गेला. मला या गोष्टीचा मोठा धक्का बसला पण माझ्या कुटुंबीयांना काहीही सांगितलं नाही. मी माझ्या एका मैत्रिणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले.

सिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...

फातिमा पुढे म्हणाली, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं डॉक्टर्सनी माझ्यावर उपचार करण्यास नकार दिला. कारण प्रथमदर्शी ही घटना पोलिस केस दिसत होती. पण मग मी त्यांना विनवण्या केल्यानंतर त्यांनी माझ्यावर उपचार करायला सुरुवात केली. त्यावेळीच डॉक्टर्सनी मला पोलिसात तक्रार करण्यास सांगितलं होतं मात्र मी बराच विचार केला आणि तक्रार न करण्याचं ठरवलं. मला वाटलं ही योग्य वेळ नाही.

भयानक स्टंट ! अभिनेता विद्युत जामवालचा नवीन व्हिडीओ व्हायरल

सुदैवानं बाळाला दुखापत झाली नव्हती

फातिमा सांगते, मी लगेचच अल्ट्रासाउंड टेस्ट केली. त्यात माझ्या बाळाला दुखापत न झाल्याचं समोर आलं. त्यानंतर समाजिक दबावामुळे माझा आत्मविश्वास कमी झाला. त्यामुळे मी याविषयी पोलिसात तक्रार केली नाही. मला माहीत नाही मला काय झालं होतं. पण मी ठरवलं होतं की, या सर्व गोष्टीमुळे मा बाळाच्या जन्मावेळी कोणतीही नवी समस्या निर्माण होऊ देणार नाही. फातिमानं दोन महिन्यांपूर्वीच मुलाला जन्म दिला. मात्र डिलिव्हरीच्या वेळी तिला ऑपरेशनची मदत घ्यावी लागली. त्यावेळी माझी तब्बेत ठीक नव्हती.

हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूड हिरोईन्सनाही मागे टाकते ही टीव्ही अभिनेत्री, पाहा फोटो

डिलिव्हरीच्या वेळी मोहसिन गर्लफ्रेंडसोबत

फातिमानं तिच्या पोस्टमध्ये अनेक गोष्ट उघड केल्या आहेत. ज्यात तिनं मोहसिनच्या गर्लफ्रेंडच्या नावाचाही उल्लेख केला आहे. ती म्हणाली, ‘जेव्हा मी लाहोरमधील एका हॉस्पिटलमध्ये लेबर पेन सहन करत होते त्यावेळी माझा पती त्याची गर्लफ्रेंड नजीश जहांगीरसोबत होता. दोन दिवसांनी तो फक्त दिखावा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. बाळासोबत एक फोटो काढला आणि तो पोस्ट केला आणि निघून गेला. त्याला बाळाची अजिबात काळजी नव्हती. त्याला फक्त या गोष्टीचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा होता.'

फातिमा पुढे लिहिते, 'जेव्हा 2 महिन्यांनी मी बाळाला घेऊन त्याच्या घरी गेले त्यावेळीही त्यानं मला पुन्हा एकदा मारहाण केली. तसेच बाळाची कोणतीही जबाबदारी घेण्यास त्यानं नकार दिला. त्यामुळे आता मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.’

वेब सीरिजमधील बोल्ड सीननंतर प्रिया बापटनं केलं हटके फोटोशूट

याबाबत मोहसिनला विचारलं असता त्यानं या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. तो म्हणाला मला आता तरी या प्रकरणावर काहीही बोलायचं नाही मी लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन याविषयी बोलेन आणि त्याचवेळी सर्व पुरावे सुद्धा सादर करेन.

=====================================================

भरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 12:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading