मुंबई, 22 जुलै : अभिनेत्री कोइना मित्रा (Koena Mitra)ला मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टानं 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एका चेक बाउंसिंग प्रकरणी कोइनाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधी मॉडेल पूनम सेठीनं केलेल्या तक्रारीनंतर कोर्टानं कोइनाला 1.64 लाख रुपये व्याजाच्या रकमेसह 4.64 लाख एवढी रक्कम पूनमला देण्याचे आदेश दिले होते. मॉडेल पूनम सेठीने 2013 मध्ये कोइनाच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र फंड नसल्यानं कोइनाच चेक बाऊंस झाला होता. त्यानंतर आता याच चेक बाऊंस प्रकरणी कोइनाला कोर्टानं 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. मात्र कोइनानं हे सर्व आरोप फेटाळले असून तिनं या निकालबाबत हाय कोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे. भयानक स्टंट ! अभिनेता विद्युत जामवालचा नवीन व्हिडीओ व्हायरल मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टानं कोइना कडून मांडण्यात आलेले सर्व युक्तीवाद खोडून काढत आपला निर्णय सुनावला. केसनुसार, कोइनानं वेगवेगळ्या वेळी जवळपास 22 लाख रुपये घेतले होते. ही रक्कम परत कराताना कोइनानं पूनमला ३ लाखाचा चेक दिला होता. जो बाउंस झाला. गरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप या प्रकरणानंतर पूनमनं कोइनाला कायदेशीर नोटीस पाठवली. त्यानंतरही कोइनानं ही रक्कम परत केली नाही. त्यामुळे पूनमनं 10 ऑक्टोबर 2013ला कोइनाच्या विरोधात केस दाखल केली. या सुनावणी दरम्यान कोइनानं हे सर्व आरोप फेटाळत पूनमची आर्थिक परिस्थितीच अशी नाही की, ती कोणाला 22 लाख रुपये देऊ शकेल असं म्हटलं होतं. याशिवाय तिनं पूनमनं चेक चोरल्याचा आरोपही केला होता. मात्र कोर्टनं कोइनानं केलेले हे सर्व आरोप फेटाळून लावत तिला आता 6 महिन्याचा तुरुंगवास ठोठावला आहे. … म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो ========================================================== भरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.