मुंबई, 09 जानेवारी: बिग बॉस मराठी 4 चा सीझन खऱ्या अर्थान गाजवला ही अभिनेत्री म्हणजे राखी सावंत . बिग बॉस या शोला कोहळून प्यायलेल्या राखीनं मराठी बिग बॉसच्या घरातही सदस्यांची पळता भुई कमी करून टाकली होती. राखी सावंत बिग बॉस मराठीमध्ये वाइल्ड कार्ड चॅलेंजर म्हणून आली. पाच आठवड्यात राखीनं घरात होत्याचं नव्हतं केलं. राखी टॉप 5मध्ये पोहोचली आणि 9 लाख रुपयांची बॅग घेऊन पाचव्या क्रमांकावर घराबाहेर पडली. मराठी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर राखी पहिल्यांदा बॉयफ्रेंड आदिलला भेटली. घराबाहेर आल्यानंतर मात्र राखीसमोर आणखी एक आव्हान उभं राहिलं आहे. राखीची आई हॉस्पिटलमध्ये एडमिट आहे. घराबाहेर पडल्यानंतर राखी अवस्था काहीशी बरी दिसली नाही. एकीकडे बिग बॉस मराठीमध्ये प्रेक्षकांचं प्रेम मिळालं होतं. 9 लाख रुपये घेऊन राखी बाहेर आली. तर दुसरीकडे बाहेर मात्र राखीच्या आईची तब्येत खालावल्याचं तिला कळलं. राखी म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच वाईट बातमी मला कळली आहे. माझी आई हॉस्पिटलमध्ये एडमिट आहे. रात्र असल्यानं मी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. बिग बॉसमधून बाहेर येताच मला ही वाईट बातमी मिळाली आहे. माझ्या आईसाठी प्रार्थना करा’. हे सांगताना राखी खूप भारावली होती. आनंद आणि दु:ख असा दोन्ही भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसनं पूर्ण केलं राखीचं ‘ते’ स्वप्न; पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर त्यानंतर आज राखी आईला भेटण्यासाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेली. तिच्या आईला कॅन्सर झाला होता ही बातमी याआधी तिनं सांगितलं होती. पण आता राखीच्या आईला ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सर असे दोन्ही आजार झालेत. त्यांचं शरीर पॅरालाइज झालं आहे. राखीनं हॉस्पिटल रुममधील व्हिडीओ शेअर केलाय ज्यात ती सगळ्यांना आईसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन करत आहेत. आईची हॉस्पिटलमधील अवस्था कशी आहे हे देखील राखीनं व्हिडीओमध्ये दाखवलं आहे.
राखीच्या आई विषयी सांगायचं झालं तर राखीच्या आईला कॅन्सर झाला आहे. त्या जास्त काळ जगू शकत नाही असं राखीनं घरात सांगितलं होतं. राखीनं मराठी बिग बॉसमध्ये जावं अशी तिच्या आईची इच्छा होती. त्या नेहमी तिला तू मराठी बिग बॉसमध्ये जा असं सांगायच्या. राखी बिग बॉसच्या घरात अनेकवेळा आईच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. फॅमिली विकमध्ये देखील आरोहच्या आईला पाहून राखीला तिच्या आईची आठवण आली आणि ती रडू लागली होती. राखीच्या आवाहनानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. राखी बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच म्हणाली, मराठी बिग बॉसचा ग्रँड फिनाले झाला. मला खूप मज्जा आली. माझ्या फॅन्सचे मी आभार मानते त्यांनी मला इतकं वोटींग केलं. त्यामुळे मी टॉप 5मध्ये येऊ शकले. संपूर्ण महाराष्ट्राचे मी आभार मानते. सलमान भाई तुमचेही आभार. तुम्ही मला इतका सपोर्ट दिला. बिग बॉस मराठीसाठी तुम्ही केलेल्या सपोर्टसाठी खूप आभार.
राखी सावंत याआधी बिग बॉस हिंदीच्या अनेक सीझनमध्ये खेळली आहे. मात्र ती कधीच विजेती ठरली नाही. बिग बॉस मराठीमध्ये देखील ती टॉप 5पर्यंत पोहोचली पण पाचव्या क्रमांकावर मला पैशांची गरज असल्याचं सांगत तिनं 9 लाखांची पैशांची बॅग घेत घराबाहेर पडणं पसंत केलं.