मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Nikki Tamboli' चे नशिब खुललं, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री

'Nikki Tamboli' चे नशिब खुललं, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री

निक्की तांबोळी 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आली. जरी ती 'बिग बॉस 14' ची ट्रॉफी जिंकू शकली नसली तरी तिच्या बोल्ड आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली. आता लवकरच ती बॉलिवूडमध्ये दिसणार आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई. 21 डिसेंबर- टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14' ’ (Bigg Boss 14) आणि 'खतरों के खिलाडी 11' मधून खूप प्रसिद्ध झालेली निक्की तांबोळी (Nikki Tamboli) टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त स्टार्सपैकी एक बनली आहे. छोट्या पडद्यावर धमाल केल्यानंतर आता निक्की मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवणार आहे. निक्की तांबोळीच्या हातात एक मोठा चित्रपट आला असून ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे.

ETimes मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, निक्की तांबोळीने अलीकडेच एक बॉलिवूड चित्रपट साइन केला आहे, ज्याचे शूटिंग देखील निक्कीने सुरू केले आहे. बातमीनुसार, निक्की तिच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत आहे. याबद्दल मात्र निक्कीच्या बाजूने अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निकीच्या चाहत्यांसाठी तिला मोठ्या पडद्यावर पाहणे एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नसेल.

वाचा-वर्दीचा सन्मान करतो पण..'; Bhuj फिल्मबाबत बोलताना शरदने व्यक्त केली खंत

बिग बॉस 14 मुळे  चर्चेत

निक्की तांबोळी 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आली. जरी ती 'बिग बॉस 14' ची ट्रॉफी जिंकू शकली नसली तरी तिच्या बोल्ड आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली. कालांतराने तिची लोकप्रियता वाढत गेली आणि तिला 'खतरों के खिलाडी 11' या शोचा भाग बनण्याची संधी मिळाली. बिग बॉस 14 मधील टास्क दरम्यान 100% देण्याव्यतिरिक्त, निक्की जान कुमार सानू, रुबिना दिलीक आणि अभिनव शुक्ला यांच्याशी असलेल्या तिच्या चांगल्या संबंधांमुळे देखील चर्चेत होती.

निक्की तिच्या चाहत्यांशी कनेक्ट एकही संधी सोडत नाही. अनेकदा व्हिडिओ आणि फोटोंद्वारे तिच्या आयुष्याची झलक दाखवत असते. निक्की तांबोळीचे इन्स्टावर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगमुळे तिचा कोणताही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होतो.

वाचा-अभिनेत्रीचा 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू , हत्या-आत्महत्या याबाबत सस्पेन्स!

टीव्हीसोबतच निक्की साऊथच्या चित्रपटांमध्येही सक्रिय आहे. तिनं 2019 मध्ये तीन दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये दोन तेलुगू चित्रपट 'Thipparaa Meesam' आणि 'Chikati Gadilo Chithakotudu' आणि एक तमिळ चित्रपट 'Kanchana' याचा समावेश होता.

First published:

Tags: Bigg boss, Bollywood News, Entertainment