मुंबई 9 ऑगस्ट**:** बिग बॉसमधून नावारुपास आलेली अभिनेत्री मीरा मिथुन (Meera Mitun) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. या सवयीमुळे अनेकदा सोशल मीडियावर तिला ट्रोल देखील केलं जातं. परंतु यावेळी ती एका मोठ्या संकटात अडकली आहे. एका वादग्रस्त व्हिडीओमुळे सायबर पोलिसांनी थेट तिला अटक केली आहे. (Meera Mithun arrest) या व्हिडीओमध्ये तिने जातियवादी टिप्पणी केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. IANS ने दिलेल्या माहितीनुसार मीरावर अनुसूचित जातींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे आरोप आहेत. तिने एका मुलाखतीदरम्यान ही वक्तव्य केली होती. अन् या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली. सोबतच काही स्वयंसेवी संस्थांनी तिच्याविरोधात तक्रार केली. अन् या तक्रारी अंतर्गत तिला अटक करण्यात आली आहे. नजरेला नजर देऊ नका, अन्यथा…; ‘रात्रीस खेळ चाले 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला मीरा एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. बिग बॉस तमिळ या रिअॅलिटी शोमधून ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. सोबतच तिने बोधी यारी बोधी मेरी, थाना सेंद्रम कोथ्तम या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. गेल्या काही काळात ती जोडी नंबर वन या डान्स शोमुळे चर्चेत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.