मुंबई 9 ऑगस्ट**:** रात्रीस खेळ चाले (Ratris Khel Chale) ही छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून चर्चेत होती. शेवंत आणि अण्णा यांच्या लव्हस्टोरीमुळे या मालिकेनं जणू लोकप्रियतेचं शिखरच गाठलं होतं. परंतु कोरोनाच्या वाढत्या संक्रमाणामुळे मालिका मध्येच थांबवावी लागली. परंतु प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे अर्धवट थांबवलेली ही मालिका आता पुन्हा एकदा नव्या भागांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रात्रीस खेळ चालेचा तीसरा सीझन येत्या 16 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा सुरू केला जाणार आहे. झी मराठीने सोशल मीडियावर एक प्रोमो रीलिज करून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. यामध्ये शेवंत अण्णांना भेटण्याची तयारी करताना दिसत आहे. “तुम्ही बोलावलं अन् मी येणार नाही असं होईल का? आलेच फक्त नजरेला नजर देऊ नका. आज पर्यंत घायाळ केलं आता मी जीवच घेईन.” असा इशारा शेवंताने या प्रोमोमध्ये दिला आहे. शेवंताचा हा मादक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दीपिकाचं आपल्या बॉडीगार्डसोबत आहे खास नातं; त्याचा पगार ऐकून व्हाल हैराण
एकता कपूरची ग्लॅमरस नागिन; पाहा सुरभीचे BOLD Photoshoot झी मराठीवर प्रचंड गाजलेली मालिका ‘देवमाणूस’ येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘देवमाणूस’ मालिकेचा दोन तासांचा महाएपिसोड दाखवण्यात येणार आहे. तर 16 ऑगस्टपासून ‘ती परत आलीये’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले 3’ मालिका देखील 16 ऑगस्टपासून रात्री 11 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता मालिकेत कोणकोणते नवे ट्विस्ट दाखवण्यात येणार आणि पुढे कथा कशी रंगत जाणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.