मुंबई, 18 नोव्हेंबर : बिग बॉसची फेमस जोडी म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा. टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांची लाडकी जोडी सोशल मीडियावरही तितकीच प्रसिद्ध आहे. बिग बॉस 15नंतर तेजस्वी आणि करण प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे कायम चर्चेत राहिले. दोघांचं नातं आता आणखी मजबूत होताना दिसत आहे. दोघांनी पर्सनल आयुष्याबरोबर त्यांच्या करिअरचा ग्राफही नेहमीच चढता ठेवला. दोघांनी त्यांच्या लग्झरी लाइफमध्येही कोणतीही कमी येऊ दिली नाही. अशातच दोघांनी नात्यात एक पाऊल पुढे टाकत आपलं नवं घर खरेदी केली आहे. हे घर मुंबईत नाही थेट दुबईत जाऊन खरेदी केलं.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सध्या दुबईमध्ये आहेत. दुबई ट्रिपचे फोटो ते शेअर करत आहेत. चाहत्यांना वाटलं होतं की दोघे दुबईला सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. मात्र प्रत्यक्षात ते घर खरेदी करण्यासाठी दुबईला गेले होते. दोघांनी दुबईमध्ये एका आलिशान घर खरेदी केलं आहे.
हेही वाचा - प्रभू देवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती Nayanthara; उचललेलं मोठं पाऊल
काही दिवसांआधी करण आणि तेजस्वीला एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघे सुट्ट्यांसाठी दुबईला जात असल्याचं सगळ्यांना वाटलं पण तिथे त्यांनी स्वप्नातील घरं खरेदी केलं आहे. टेली टाउननं दिलेल्या वृत्तानुसार, करण आणि तेजस्वी यांनी दुबईमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. बिल्डिंग तयार करणाऱ्या कंपनीनं लाँच इव्हेंटमध्ये दोघांच्या नव्या घराची घोषणा केली. घराच्या चाव्यांचा ताबा घेतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
I'm so freaking proud of you✨ Evil eyes off your happiness and success @kkundrra @itsmetejasswi TEJRAN AT ELITZ LAUNCH#KaranKundrra#TejasswiPrakash #TejRan pic.twitter.com/4itGXhzcN5
— Manasvi♡♡ (@xfourtoforeverx) November 17, 2022
घरात आहे प्रायव्हेट पूल
करण आणि तेजस्वीनं दुबईमध्ये 1 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. ज्याची किंमत आहे 2 करोड रुपये. घरात इनडोर पूल तसंच अनेक लग्झरी सुविधा आहेत. हा फ्लॅट दुबईच्या पाम जुमेराह बीच रेसिडेंसीमध्ये आहे.
तेजस्वीनं काही दिवसांआधी गोव्यात एक अपार्टमेंट खरेदी केली. करण कुंद्रानं तेजस्वीच्या नव्या घराबद्दल आनंद व्यक्त केला होता. तर करणनं देखील काही महिन्यांआधी मुंबईमध्ये एक आलिशान फ्लॅट खरेदी केला. तेजस्वी आणि करण यांच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर, तेजस्वीचा नवा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सध्या ती नव्या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे तर करण कुंद्रा पंजाबी सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Dubai