साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा खूप लोकप्रिय आहे. 18 सप्टेंबर 1984 रोजी जन्मलेली नयनतारा आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2022 हे वर्ष नयनतारासाठी खूप चांगले ठरले. तिचा आणि चिरंजीवी स्टारर 'गॉड फादर' या चित्रपटाने या वर्षी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला, तर दुसरीकडे, यावर्षी तिने दक्षिणेकडील चित्रपट दिग्दर्शक शिवन विघ्नेशसोबत लग्न केले आणि सरोगसीच्या मदतीने या जोडप्याने जुळ्या मुलांना जन्म दिला.
मात्र एक काळ असा होता की नयनतारा दिग्दर्शक प्रभू देवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्याच्याशी लग्न करण्यासाठी ती काहीही करायला तयार होती.
2009 मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा होत्या. याशिवाय नयनताराने प्रभू देवाच्या नावाचा टॅटूही काढला होता.
नयनताराने प्रभू देवाच्या बायकोला त्याच्यापासून दूर जाण्यासाठी पैसैही ऑफर केले असल्याच्याही चर्चा होत्या.
प्रभू देवाचं लग्न झालेलं असतानाही त्याचं नयनतारावर प्रेम होतं. 2010 मध्ये प्रभुदेवाच्या पत्नीने त्याच्या विरोधात कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत नयनतारासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रभुदेवावर कारवाई करण्याचे म्हटले होते.