जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'वडिलांची मदत असती तर आज मी इंडस्ट्रीत...'; कुमार सानूंविषयी मुलाचं मोठं वक्तव्य

'वडिलांची मदत असती तर आज मी इंडस्ट्रीत...'; कुमार सानूंविषयी मुलाचं मोठं वक्तव्य

jan kumar sanu

jan kumar sanu

कुमार सानू आणि रीता भट्टाचार्य यांचा घटस्फोट झाल्यानंतर जान कुमार वडिलांपासून दूर राहिला आहे. वडिलांविषयी गायक काय म्हणाला पाहा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 03 एप्रिल : बॉलिवूडचे दिग्गज गायक कुमार सानू आणि त्यांचा मुलगा गायक जान कुमार सानू यांचे वाद नेहमीच चव्हाट्यावर येत असतात. जान कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.  दोघा बाप लेकांचं नातं फारसं बरं नसलं तरी दोघांमधील वाद काही आजवर लपून राहिलेले नाही.  कुमार सानू आणि रीता भट्टाचार्य यांचा घटस्फोट झाल्यानंतर जान कुमार वडिलांपासून दूर राहिला आहे. जान कुमार बिग बॉस 14मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तेव्हा त्यानं आई वडिलांबद्दल अनेक खुलासे केले होते. त्याचप्रमाणे,  वडिलांनी मला कधीच इंडस्ट्रीत येण्यासाठी मदत केली नाही, असं देखील जान कुमार म्हणाला होता. जान कुमार यानं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं वडिलांविषयी खुलासा केलाय.  वडिलांनी आपल्याला इंडस्ट्रीत येण्यासाठी कोणताही मदत केली नाही याची खंत जान कुमारच्या मनात आहे. पण त्याबद्दल त्याची कोणतीही तक्रार देखील नाहीये. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जान कुमारनं म्हटलं आहे की, “जर त्यांनी माझी मदत तेली असती तर आज कदाचित इंडस्ट्रीमध्ये माझं मोठं नाव असतं. पण ठीक आहे. याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाहीये. माझी कोणताही मागणीही नाहीये. देवावर माझा विश्वास आहे आणि मी पाहतोय की त्यानं माझ्यासाठी काय विचार केला आहे”. हेही वाचा - Fact Check : खरंच इतक्या जवळ आले होते सलमान-ऐश्वर्या? NMACCमधील आराध्याबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

जाहिरात

आई -वडील विभक्त झाल्यानंतर अनेक मुलांचं पुढचं आयुष्य वाईट जातं. आई वडिलांची कमी जाणवत राहते. जान कुमारच्या आयुष्यातही त्याला नेहमीच वडीलांची कमी होती. त्यानं सांगितलं की, मला वडिलांविषयी काहीच माहिती नव्हती. माझी आईचं माझे वडील होती. मला अनेक वर्षांनी माझे वडील असल्याचं कळलं. लहानाचा मोठा होत असताना माझी माझ्या वडिलांबरोबर एकही आठवण नाहीये. पण जेव्हा मला कळलं की माझे वडील कोण आहे आणि काय करतात तेव्हा ते स्वीकारणं माझ्यासाठी चॅलेजिंग होतं.  माझं भाग्य म्हणून की दुर्भाग्य पण मला देखील तेच क्षेत्र निवडावं लागलं. मला माझ्या जीवावार काही तरी करायचं आहे. बघूया आता पुढे काय घडतं.

News18लोकमत
News18लोकमत

कुमार सानू यांनी 80च्या दशकात रीता भट्टाचार्यबरोबर लग्न केलं. त्यांना तीन मुलं झाली. जान त्याच मुलांपैकी मोठा मुलगा आहे. 1994मध्ये कुमार सानू आणि रीता यांचा घटस्फो झालं.  त्यावेळी रीता भट्टाचार्य 6 महिन्यांची प्रेग्नंट होती. रीताबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर कुमार सानू यांनी सलोनी साहू यांच्याबरोबर लग्न केलं होतं. सलोनी आणि कुमार यांना 2 मुली झाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात