मुंबई, 17 ऑक्टोबर : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान सध्या ‘बिग बॉस 16’ मध्ये आहे. त्याच्या बिग बॉसच्या सहभागावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बॉलीवूडसह अनेक महिलांनी साजिदच्या बिग बॉसच्या घरातील प्रवेशावर टीका केली आहे, अनेकांनी आरोप केले आहेत. अशातच साजिदविषयी जुन्या गोष्टी पुन्हा नव्यानं समोर येत असल्याचं दिसत आहे. त्याच्याविषयीची बरीच माहिती सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अशातच त्याचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो त्याचं कॅरॅक्टरविषयी बोलताना दिसत आहे. साजिद खानचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामुळे तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. साजिद खानचा आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्वतःच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना दिसत आहे आणि गौहर खानसोबतचे लग्न मोडल्याबद्दलही बोलत आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा - वैशाली टक्कर लवकरच करणार होती लग्न, मृत्यूच्या एक दिवस आधी मित्रांना फोन करुन म्हणाली… साजिदची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या पूर्वीच्या नात्यांबद्दल सांगितले होते. व्हिडिओमध्ये, त्याने गौहर खानशी लग्न केल्याचे कबूल केले आणि सांगितले की अनेक लिंकअप असूनही त्याने कधीही लग्न केले नाही. तो म्हणाला की, गौहरसोबत त्याची एंगेजमेंट असूनही तो अनेक मुलींना ‘आय लव्ह यू’ म्हणत असे, त्यांच्यासोबत हँग आउट करत असे.
दरम्यान, साजिदचा हा जुना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर आणखी संताप व्यक्त केला जात आहे. मी टू अंतर्गत अनेक बॉलिवूड दिग्गजांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे साजिद खान. या आरोपांनंतर साजिद गेल्या चार वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही.