मुंबई, 17 ऑक्टोबर : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली टक्करच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशालीने अचानक हे टोकाचं पाऊल का उचललं असावं?, असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे. इंदूर येथील राहत्या घरी वैशालीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अशातच वैशालीविषयी आणखी माहिती महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
वैशालीच्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत ती ठीक होती आणि लवकरच विवाहबंधनात अडकणार होती. अभिनेता विकास सेठी आणि त्याची पत्नी जान्हवी राणा वैशालीच्या खूप जवळ होते. तिने आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी वैशालीशी फोनवर तिचं बोलणं झालं होतं. वैशाली लग्नाच्या खरेदीसाठी मुंबईला येणार असा प्लॅन केला होता. ही अभिनेत्री डिसेंबरमध्ये कॅलिफोर्नियास्थित एका सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न करणार होती.
हेही वाचा - मोठी बातमी! 'ये रिश्ता क्या केहेलाता है' फेम अभिनेत्री वैशाली टक्करची आत्महत्या
वैशालीविषयी मित्र विकास म्हणाला, वैशाली डिसेंबरमध्ये लग्न करणार होती. दोघांचे कुटुंबीय लग्नाची तारीख निश्चित करणार होते. शुक्रवारी जेव्हा मी तिच्याशी बोललो तेव्हा तिनं सर्वकाही छान असल्याचं सांगितलं. वैशाली म्हणाली होती की ती आमच्यासोबत शॉपिंग आणि पार्टी करेल. अशा परिस्थितीत वैशालीने आत्महत्या केल्याची बातमी मला हादरवून गेली.
दरम्यान, पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. वैशाली टक्कर आत्महत्येप्रकरणी तेजाजी नगर पोलीस ठाणे तपास करत आहेत. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असल्याने लवकरच या घटनेचा उलघडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sucide attempt, Tv actress