जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Shiv Thakare: 'आई कसं वाटतंय मुलाबद्दल..' शिवच्या आईने दिलेल्या 'त्या' उत्तराने सलमानही भारावला

Shiv Thakare: 'आई कसं वाटतंय मुलाबद्दल..' शिवच्या आईने दिलेल्या 'त्या' उत्तराने सलमानही भारावला

शिव ठाकरे

शिव ठाकरे

शिवची आई या आठवड्यात बिग बॉसच्या घरात येणार आहे. तेव्हा सलमानने शिवच्या आईसोबत चक्क मराठीत गप्पा मारल्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 जानेवारी:  सध्या छोट्या पडद्यावर हिंदी बिग बॉसमध्ये मराठमोळा शिव ठाकरे धुमाकूळ घालताना दिसतोय. त्याने आपल्या दमदार खेळाने इतर स्पर्धकांना मागे टाकलंय. इतकंच नाही तर शिवचा खेळ पाहून मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकही त्याच्या पाठीशी उभे आहेत. शिव ठाकरेने भारतभर हवा केली आहे.  हिंदी प्रेक्षकांनाही त्याने भुरळ घातलीये. ‘बिग बॉस मराठी २’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर आता त्याने आपलं लक्ष ‘बिग बॉस 16 वर केंद्रित केलं आहे. ही ट्रॉफी मिळवण्यासाठी तो प्रचंड मेहनत करताना दिसतोय. आता शिवची आई या आठवड्यात बिग बॉसच्या घरात येणार आहे. तेव्हा सलमानने शिवच्या आईसोबत चक्क मराठीत गप्पा मारल्या. बिग बॉस  16 च्या घरात या आठवड्यात फॅमिली वीक असणार आहे. या दरम्यान विशेष करून स्पर्धकांची आई घरात त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी येणार आहे. यामध्ये शिव ठाकरेंची आई देखील आली. त्याचा एक व्हिडीओ शिवने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान शिवच्या आईसोबत मराठीत गप्पा मारताना दिसतोय. हेही वाचा - Bigg Boss 16: शालीन आणि टीना करत होते चक्क ‘बेबी प्लॅनिंग’; भांडता-भांडता उघड झालं गुपित सलमान शिवच्या आईला विचारतो, ‘आई कसं वाटतंय तुम्हाला तुमचा मुलगा फार छान खेळतोय’ त्यावर शिवची आई म्हणते कि, ‘फार छान वाटतंय शिव माझं नाव रोशन करत आहे. घरात सगळ्यांसोबत राहून सगळ्यांचं मन जिंकत आहे.’ त्यावर सलमान खान शिवचं कौतुक करत म्हणतो, ‘तो सगळ्यांमधला मास्टरमाइंड आहे. तो खूप छान खेळतो.’ हे ऐकून शिवची आई चांगलीच खुश होते.

जाहिरात

शिवची आई त्याच्यासाठी नेहमीच खंबीरपणे उभी राहिली आहे. त्याच्या प्रत्येक संकटात, अडचणीत, गरजेच्या वेळी ती कायमच त्याच्यासाठी सावली बनली आहे. ती शिवचा आधारस्तंभ आहे. आता खेळाच्या अखेरच्या काही दिवसात शिवच्या आईला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांना विचारलं गेलं की शिव ही ट्रॉफी जिंकू शकेल का? त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली. त्या म्हणाल्या होत्या कि,  ‘बिग बॉस १६’ मध्ये शिव ज्या प्रकारे खेळत आहे त्यावर मी खूप खुश आहे. मला त्याचा खेळ आवडतोय. तो फक्त माझा मुलगा आहे म्हणून मी असं बोलत नाहीये तर विजेता होण्याचे सर्व गुण माझ्या शिवमध्ये आहेत आणि माझ्या या वाक्यावर सर्व प्रेक्षकही नक्कीच सहमत होतील. त्याचा खेळ सगळ्यांनाच आवडतोय. आशा करते की शिव नक्कीच ट्रॉफी जिंकून येईल.’

News18लोकमत
News18लोकमत

शिवच्या आईने दिलेल्या या उत्तराने त्याच्या चाहत्यांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. आता ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी नक्की कोण जिंकणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र शिव या विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. त्याच्या खेळाने खरंच नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. तर त्याचे चाहते शिवसाठी प्रार्थना करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात