मुंबई, 29 ऑक्टोबर- ‘बिग बॉस 16’ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ‘शुक्रवार का वार’ पार पडला. सलमान खान डेंग्यूमधून ठीक होऊन शोमध्ये परतला आहे. त्यामुळे हा आठवडा सलमान खानने होस्ट केला होता. सलमानने परत येताच घरातील सदस्यांना एक टास्क दिला आहे. ज्यामध्ये सर्व स्पर्धकांना सांगायचं होतं की, कोणत्या दोन स्पर्धकांना घरात पालकांची गरज आहे. कुटुंबातील बहुतांश सदस्यांनी अंकित गुप्ता आणि सुंबुल तौकीर यांची नावे घेतली. काही लोकांनी प्रियांका चौधरी चहर आणि अब्दू रोजिक यांचीही नाव घेतली. परंतु या टास्कमध्ये सुंबुल आणि अंकितला वेगळ्या खुर्चीवर बसवलं गेलं. यामध्ये सलमानने प्रथम संबुलची चांगलीच शाळा घेतली. नंतर अंकितालादेखील खडेबोल सुनावले. दरम्यान आज शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ , ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हजेरी लावणार आहेत. हे कलाकार आपल्या आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी येणार आहेत. नुकतंच या शोचा एक व्हिडीओ फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये कतरिना सलमान खानसोबत मजामस्ती करताना दिसून येत आहे. लग्नानंतरही सलमान खान आणि कतरिना कैफची मैत्री कायम आहे. या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहेत. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. **(हे वाचा:** लग्नानंतर पहिल्यांदाच कतरिना-सलमानची होणार नजरा-नजर; बिग बॉस 16 च्या मंचावर जुन्या आठवणी रंगणार? ) समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ बिग बॉसच्या मंचावर धम्माल करताना दिसून येत आहेत. यावेळी कतरिना कैफ सलमान खानला एक चॅलेंज देत आहे. आणि ते चॅलेंज म्हणजे अभिनेत्री सलमान खानला आपल्या ’ टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावर डान्स करायला सांगत आहे. दुसरीकडे सलमान क्षणाचाही विलंब न करता डान्स करायला सुरुवात करतो. यावेळी कतरिनाही त्याला साथ देते. दरम्यान सलमान एकसारखं डान्स करतच राहतो कतरिना त्याला थांबण्यास सांगते. सलमानने अशाप्रकारे या क्षणाला विनोदी बनवलं आहे.
तसेच कतरिना कैफ सलमान खानला एक प्रश्न विचारते. मात्र सलमान खान त्याला जे उत्तर देतो ते ऐकून अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. कतरिना सलमान खानला विचारते, ‘जर तुला भूत बनण्याची संधी मिळाली, तर तू भूत बनून कोणाची जासूसी करशील? यावर उत्तर देत सलमान खान म्हणतो अशी फक्त एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे विकी कौशल. मी त्याची जासूसी करणं पसंत करेन. हे उत्तर ऐकून सर्वच थक्क होतात. यावर कतरिना विचारते का? तर सलमान खान म्हणतो कारण तो चांगला आहे, खरा आहे, धाडसी आहे. यावर कतरिना स्मितहास्य करुन प्रतिसाद देते.
सलमान खान आणि कतरिना कैफ गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सलमान खानने कतरिनाला अनेक चित्रपटांमध्ये काम मिळवून दिल्याचं आणि तिचं करिअर बनवायला मदत केल्याचं सांगितलं जातं. कतरिना सतत सलमानसोबत दिसून येत असे. इतकंच नव्हे तर सलमान खानच्या कुटुंबासोबतही कतरीनाचं नातं फार छान आहे. तिच्या बहिणींसोबत कतरिनाचं चांगलं जमतं. परंतु काही वर्षांपूर्वी सलमान खान आणि कतरिनाचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर कतरिना रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आता अभिनेत्रीने विकी कौशलसोबत लग्न केलं आहे.