मुंबई, 14 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस 16 त्याच्या प्रीमियरच्या दिवसापासून चर्चेत आहे. नेहमीप्रमाणे या शोमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले आहेत. दरम्यान, शोचे पहिले एलिमिनेशन शनिवारी होणार आहे. या आठवड्यात ज्या स्पर्धकांना सलमान खानच्या शोमधून बाहेर पडण्यासाठी नामांकन मिळाले आहे ते म्हणजे टीना दत्ता, गोरी नागोरी, एमसी स्टॅन, शालिन भानोत आणि श्रीजिता डे. म्हणजेच या वीकेंड शोचा होस्ट सलमान खान शोमधून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा करणार आहे. दुसरीकडे, सर्व स्पर्धक देखील स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता वृत्तांवर विश्वास ठेवला तर ‘उत्तरन’ फेम अभिनेत्री श्रीजिता डे हिला या आठवड्यात शोमधून बाहेर काढण्यात येणार आहे. म्हणजेच श्रीजीता ही पहिली स्पर्धक असेल, जी बिग बॉसच्या घराला अलविदा करेल. बिग बॉसच्या अनेक फॅन पेजने सोशल मीडियावर इव्हिक्शन अपडेट शेअर केले आहेत. तथापि, अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही आणि केवळ वेळच सांगेल की श्रीजीता डे या आठवड्यात बिग बॉस 16 च्या घरातून बाहेर पडेल की नाही. हेही वाचा - BB16 : अखेर सलमान खानही हटला मागे; साजिद खान प्रकरणात उचललं कठोर पाऊल हरियाणाची ‘शकीरा’ म्हणून ओळखल्या जाणार्या गोरी नागोरीसोबतच्या तिची लढाईच्या एका दिवसानंतर श्रीजिताच्या हकालपट्टीची बातमी आली आहे, ज्याची प्रचंड चर्चा होत आहे. अलीकडेच दोन्ही स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत झाली, जिथे श्रीजीताने हरियाणवी गायिका गोरी नागोरी हिला ‘स्टँडर्ड लेस’ आणि ‘मनोर लेस’ असे संबोधले.
श्रीजीताच्या गोरी नागोरीसोबत झालेल्या भांडणावर तिचा मंगेतर मायकलनेही प्रतिक्रिया दिली. मायकल म्हणाला- ‘श्रीजीता कालची घटना अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकली असती. मात्र, कुटुंबातील अनेकांनी त्यात उडी घेतल्याने दोघांमधील वाद नियंत्रणाबाहेर गेला हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आता घरामध्ये आणखी काय घडणार, कोण शोमधून एक्झिट घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.