मुंबई, 14 ऑक्टोबर : ‘बिग बॉस 16’ दिवसेंदिवस रंजक वळण घेताना दिसत आहे. नुकतंच झालेल्या भागात शालीन भानोतने टीना दत्ताबद्दलच्या आपल्या भावना सांगितल्या तर दुसरीकडे शालीनला टीनाच्या जवळ जाताना पाहून गौतम सिंहच्या मनात भिती निर्माण होत आहे. अशातच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित करत आहे. या व्हिडीओनं घरात नवा वाद पहायला मिळतोय. घराचा कॅप्टन, गौतम, टीनासोबत सतत फ्लर्ट करून शालीनला जेलेस करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. यासोबतच त्याची सौंदर्या शर्मासोबतची फ्लर्टिंगही सुरू आहे. यातच शालिनने सौदर्याच्या गालावर किस केलं. यामुळे गौतम आणि टीना दोघेही शालिनवर चिडले आहेत. सौंदर्या गौतमला शांत करण्याचा प्रयत्न करते कारण ते चांगले मित्र आहेत. तर शालिनही टीनाला हे मस्तीमध्ये केल्याचं म्हणतो. शालिनच्या या किसमुळे बिग बॉसच्या घराचं वातावरण बिघडलं आहे. याशिवाय सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर प्रतिसाद येत असल्याचं दिसत आहे.
Soundarya ko kiss karne par, Shalin hua confront, kya ab isse khadi hogi nayi musibat? 🫣
— Bigg Boss (@BiggBoss) October 13, 2022
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9.30 baje, sirf #Colors par.
Anytime on @justvoot#BB16 #BiggBoss@beingsalmankhan@tresemmeindia @chingssecret @myglamm pic.twitter.com/0iBwhiAFqs
बिग बॉस सर्वांना एकत्र जमवतात आणि विचारतात की त्यांना कोणाचा आवाज सर्वात जास्त त्रास देतो आणि अर्चनाला सर्वाधिक मते मिळतात. अर्चनाला बिग बॉसने पुढील आदेश येईपर्यंत न बोलण्यास सांगितले आणि कन्फेशन रूममध्ये बोलावले. शालीनला बिग बॉसने बोलावले आणि तिला 2 आठवड्यांसाठी चिकनचा विशेषाधिकार दिला.
दरम्यान, शालिन भानोट हा घरातील सर्वात मनोरंजक स्पर्धकांपैकी एक म्हणून समोर येत आहे, तो शोमध्ये त्याच्या वर्तनाने वादातही सापडत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता घरामध्ये आणखी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.