मुंबई, 14 जानेवारी- छोट्या पडद्यावरील वादग्रस्त परंतु तितकाच लोकप्रिय शो म्हणजे 'बिग बॉस' होय. हा शो कधी स्पर्धकांमुळे, कधी स्पर्धकांच्या कुटुंबामुळे तर कधी घरात घडणाऱ्या विविध घटनांमुळे चर्चेत असतो. सध्या बिग बॉसचा 16 वा सीजन जोरदार चर्चेत आहे. यामध्ये दररोज काही ना काही रंजक पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वानंतर आता सर्वांचं लक्ष बिग बॉस 16 आहे. बिग बॉस 16 च्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस राहिले असताना आता स्पर्धकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. दरम्यान स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आणि देण्यासाठी घरात दाखल झाले होते. यामध्ये स्पर्धक शिव ठाकरेची आईसुद्धा आली होती. त्यांनासुद्धा प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. दरम्यान आत त्यांचं एक वक्तव्य जोरदार चर्चेत आलं आहे.
'बिग बॉस'चा 16 वा सीजन सध्या अतिशय उत्कंठा वर्धक वळणावर येऊन पोहोचला आहे. यामध्ये स्पर्धक स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी चढाओढ करत आहेत. दरम्यान घरामध्ये विविध गोष्टी घडताना दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये घरातील स्पर्धकांसाठी फॅमिली वीकचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सर्व स्पर्धकांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. यामध्ये कुटुंबीयांनी घरात येत आपल्या स्पर्धक मुला-मुलींना योग्य सल्ला देत धीर देण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेला स्पर्धक शिव ठाकरेची आईसुद्धा सहभागी झाली होती. शिव ठाकरेच्या आईने घरात येत स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांचीही मने जिंकली आहेत. शिवच्या आईने आपल्या प्रेमळ आणि साध्याभोळ्या स्वभावाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या शिव प्रमाणे त्याच्या आईची सुद्धा मोठी चर्चा होत आहे. अशातच शिव ठाकरेच्या आईने घरातून बाहेर आल्यानंतर एका वेबसाईटला मुलाखत देत वीणा जगतापबाबत केलेलं वक्तव्य प्रचंड चर्चेत आलं आहे.
बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेच्या आईने टेलीचक्करला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांना शिव आणि वीणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना त्यांनी म्हंटल, हा विषय आता संपला आहे... वीणा एक चांगली मुलगी आहे. ती बिग बॉसच्या घरात शिवची चांगली मैत्रीण होती.. नंतर तिने शिवसोबत लग्न करण्याचा ड्रामासुद्धा केला'. असं त्या बोलता बोलता बोलून गेल्या सध्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा होत आहे.
शिव ठाकरे आणि वीणा जगताप बिग बॉस मराठीच्या घरात भेटले होते. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात ते सहभागी झाली होते. यामध्ये शिव होता. परंतु बिग बॉसच्या घरात ते एकमेकांच्या जवळ आले होते.घरातील त्यांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत आली होती. घरायू बाहेर आल्यांनतर सुद्धा दोघे नात्यात होते. ते एकमेकांच्या कुटुंबाला भेटत होते. परंतु अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आणि त्यांचं दिसणंही बंद झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment