मुंबई, 4 जानेवारी- टीव्हीवरील धमाकेदार शो 'बिग बॉस 16' सध्या उत्कंठावर्धक वळणावर आला आहे. हा शो कधी आपल्या फॉरमॅट मुळे, कधी स्पर्धकांमुळे तर कधी स्पर्धकांमध्ये होणाऱ्या राड्यांमुळे चर्चेत असतो. आत्ताही असंच काहीसं झालं आहे. बिग बॉसच्या 16 च्या महाअंतिम सोहळ्याला काही अवघे काही दिवस उरले असताना स्पर्धकांमध्ये घरात टिकून राहण्यासाठी प्रचंड चढाओढ सुरु आहे. अशातच स्पर्धक एकमेकांशी पंगे घेताना दिसून येत आहेत. नुकतंच बिग बॉसच्या घरात अर्चना गौतम आणि एमसी स्टॅनमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळालं. यादरम्यान एमसीने स्वतःला बाथरुममध्ये कोंडून घेतलं होतं. तसेच तो अर्चनाला कानाखाली लावण्याचा विचार करत होता. परंतु यामध्ये शिव ठाकूरने त्याला अडवले.
बिग बॉसच्या घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला. हा खेळ स्पर्धकांच्या चुरशीने चांगलाच रंगला होता. या टास्कमध्ये सर्वांना मागे टाकत अब्दू रोजिकने टास्क जिंकला आणि तो घराचा नवा कॅप्टनदेखील बनला. अशातच अर्चनाने इतर स्पर्धकांसोबत वादविवाद केला. यावेळी ती बाथरुमच्या ड्युटीसाठी शिव ठाकूरसोबत धक्काबुक्की करते. आणि त्यामुळे दोघांतील वाद शिगेला पोहोचला होता. या भांडणात अर्चना शिवला फट्टू म्हणून संबोधते तर शिव तिला कामचोर म्हणतो. दरम्यान श्रीजीता मध्ये येऊन अर्चना नॉमिनेट झाल्यामुळे हा सर्व प्रकार सर्व करत असल्याचं म्हणते.
(हे वाचा:BB16: बिग बॉस स्पर्धकाच्या पत्नीचा शिव ठाकरेवर कपडे चोरीचा आरोप;मॅनेजरने दिलं चोख उत्तर )
दरम्यान अर्चना अब्दूशी संवाद साधत म्हणते, 'तू घरातील कॅप्टन आहेस, तू निष्पक्ष राहा. यावर अब्दू अर्चनाला म्हणतो, मी सर्व तपासून आलो आहे. तुला जर इतकंच वाईट वाटत असेल तर तू स्वतः जाऊन बाथरुमची स्वच्छता करु शकतेस. अब्दूच्या या म्हणण्याला नकार देत अर्चना म्हणते, मी याठिकाणी बाथरुम साफ करायला आलेली नाहीय'. थोडा वेळ गप्प राहिल्यानंतर अर्चना पुन्हा भांडण सुरु करते. यावेळी निम्रित तिला म्हणते, तू इतरांच्या समोर नको म्हणून एमसी स्टॅनला जे म्हणायचं आहे तू त्याच्या तोंडावर बोल'.
त्यानंतर एमसी स्टॅन आणि अर्चना गौतममध्ये वादविवाद सुरु होतो. हा वाद इतका टोकाला पोहोचतो की, दोघेही एकमेकांच्या पालकांनाव वक्तव्य करायला सुरुवात करतात. एकमेकांना प्रचंड शिवीगाळदेखील करतात.साजिद खान या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करतो परंतु दोघेही काहीही ऐकायला तयार नसतात. त्यामुळे वाद पुढे सुरुच राहतो. दरम्यान अर्चनाने केवळ फुटेजसाठी आपल्यासोबत भांडण केल्याचा आरोप एमसी स्टॅन करतो.
तसेच भांडणादरम्यान स्टॅन स्वतःला बाथरुममध्ये कोंडून घेतो. यावेळी शिव त्याला समजावण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु साजिद खानच्या बोलण्यावरुन एमसी स्टॅन पुन्हा एकदा भडकतो आणि अर्चनाला कानाखाली लावण्याचा निर्णय घेतो. परंतु शिव त्याला असं करण्यापासून थांबवतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment, Tv actors