'बिग बॉस १६'च्या घरात गेल्यापासूनच शिव ठाकरे प्रचंड चर्चेत होता. शो संपल्यानंतरसुद्धा शिव सतत चर्चेत आहे.
शिवसुद्धा आपल्या चाहत्यांना निराश नाही करत, त्यामुळेच अभिनेत्याने चाहत्यांना एक सरप्राईज दिलं आहे.
चाहत्यांच्या जास्तीत-जास्त संपर्कात राहण्यासाठी आणि सतत आपल्या लहान-मोठ्या अपडेट्स त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी शिवने एक शक्कल लढवली आहे.
या युट्युब चॅनेलद्वारे शिव आपल्या दैनंदिन गोष्टी आणि येणाऱ्या नवनव्या प्रोजेक्टसबाबत माहिती देताना दिसणार आहे.
चॅनेल सुरु करताच २३ हजार लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. येत्या काळात १०० हजार लोकांनी सबस्क्राइब करावं अशी शिवची इच्छा आहे.