मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री होणार; शमिता शेट्टीला मिळणार सरप्राईझ, करण कुंद्राला मोठा झटका

Bigg Boss 15 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री होणार; शमिता शेट्टीला मिळणार सरप्राईझ, करण कुंद्राला मोठा झटका

बिग बॉस 15 मध्ये लवकरच वाइल्ड  कार्ड एंट्री होणार आहे. यामध्ये अनुषा दांडेकर आणि राकेश बापट यांची नावं आघाडीवर आहेत.

बिग बॉस 15 मध्ये लवकरच वाइल्ड कार्ड एंट्री होणार आहे. यामध्ये अनुषा दांडेकर आणि राकेश बापट यांची नावं आघाडीवर आहेत.

बिग बॉस 15 मध्ये लवकरच वाइल्ड कार्ड एंट्री होणार आहे. यामध्ये अनुषा दांडेकर आणि राकेश बापट यांची नावं आघाडीवर आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 ऑक्टोबर : बिग बॉस 15 (Bigg Boss 15) मधील पहिल्याचा आठवड्यात सगळीकडे धुमाकुळ घातला आहे. बिग बॉसच्या आतपर्यंतच्या सीजनचा विचरा करता यंदाच्या सीजनमधील काहीसे सगळ्या गोष्टीत सुपरफास्टच निघाले आहेत असे म्हटले वावगे वाटायला नको. किसिंग सिन्स काय आणि भांडण काय.. पहिल्याच आठवड्यात यंदाच्या सीजनमधील स्पर्धकांनी नुसता राडा घातला आहे. आत अशातच शोचे निर्माते देखील कसे मागे राहतिल त्यांनी देखील शो हिट करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवली आहे. आता घरात लवकरच वाइल्ड कार्ड एंट्री (Bigg Boss Wild Card Entry) करण्याच्या तयारीत शोचे निर्माते आहेत. ज्यामुळे घऱातील सर्व सदस्यांचा ताळमेळ बिघडण्याची शक्यता आहे.

यामध्ये आघाडीवर नाव आहेत ती म्हणजे बिग बॉस ओटीटीचा स्पर्धक आणि शमिता शेट्टीचा जवळचा मित्र राकेश बापट(Raqesh Bapat) याचे आहे. तसर दुसर नाव देखील शोमधील एका प्रसिद्ध चेहऱ्याशी म्हणजे करण कुंद्राशी (Karan Kundrra) संबंधीत आहे. करणची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) हिचे आहे. ही दोन नाव सध्या चर्चेत आहेत. या शोसाठी अनुषकाला मोठी रक्कम ऑफर दिल्याची चर्चा आहे. करण आणि अनुषा सहा वर्षाच्या रिलेशनशिपनंतर वेगळे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपची बी टाऊनमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

वाचा : जेव्हा घरात पाल येते... सिद्धार्थ-मिताली सेलेब्रिटी कपलच्या घरातला VIDEO आला बाहेर

ब्रेकअप नंतर अनुषाने करणने तिला फसवल्याचा आरोप केला होता. तर नुकतेच करणने देखील अनुषा या शोमध्ये सहभागी झाली तर मला याचा काही फरक पडणार नसल्याचे सांगितलं होत. त्यामुळे करण कुंद्रा यासाठी पहिल्यापासून तयार आहे.

View this post on Instagram

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

राकेश बापटविषयी सांगायचे तर त्याने नुकताच त्याची पत्नी रिद्धी डोगरा हिच्यासोबत घटस्फोट घेतला आहे. ज्यानंतर तो बिग बॉस ओटीटीमध्ये दिसला होता. यावेळी त्याची आणि शमिता यांची जवळकीता पाहून प्रेक्षक देखील यांच्यात काय तरी आहे ...अशी चर्चा करत होते. घऱातून बाहेर पडल्यानंतर देखील या दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

वाचा : ''त्याने चेकअप करताना अचानक इतरत्र स्पर्श केला अन्...'' डॉक्टरांनीच Neena Gupta यांचा बाल वयात केला होता विनयभंग

या शोमध्ये या दोघांच्यातील प्रेम तर चर्चेचा विषय होतच पण यांच्यातील भांडण देखील तितकिच चर्चिली गेली. यासोबतच शमित बिग बॉस 15 मध्ये येण्यापूर्वी या दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे यापैकी कोण घऱात प्रवेश करणार याची उत्सुकता लागली आहे.

First published:

Tags: Bigg boss, Bigg Boss OTT, Entertainment, Tv shows