मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

''त्याने चेकअप करताना अचानक इतरत्र स्पर्श केला अन्...'' डॉक्टरांनीच Neena Gupta यांचा बाल वयात केला होता विनयभंग

''त्याने चेकअप करताना अचानक इतरत्र स्पर्श केला अन्...'' डॉक्टरांनीच Neena Gupta यांचा बाल वयात केला होता विनयभंग

नीना गुप्ता यांचे सच कहूँ तो' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी एका खळबळजनक गोष्टीचा खुलासा देखील केला आहे.

नीना गुप्ता यांचे सच कहूँ तो' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी एका खळबळजनक गोष्टीचा खुलासा देखील केला आहे.

नीना गुप्ता यांचे सच कहूँ तो' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी एका खळबळजनक गोष्टीचा खुलासा देखील केला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 ऑक्टोबर : बॉलिवू़ड अभिनेत्री नीना गुप्ता (neena gupta) नेहमीच त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजामुळे चर्चेत असतात. नीना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतचं त्यांचं 'सच कहूँ तो' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या आत्मचरित्रामध्ये नीना गुप्ता यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. या आत्मचरित्रामध्ये  (Sach Kahun Toh )त्यांनी एका खळबळजनक गोष्टीचा खुलासा देखील केला आहे. डॉक्टरांनीच त्यांचा बाल वयात विनयभंग केला, असा खुलासा त्यांनी या आत्मचरित्रात केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नीना गुप्ता यांचे नाव चर्चेत आलं आहे.

नीना यांनी या आत्मचरित्रात त्यांच्यासोबत बाल वयात घडलेल्या विनयभंगाच्या प्रकाराविषयी लिहिलं आहे की, "मी लहान असताना भावासोबत डॉक्टरांकडे गेले होते. त्यावेळी माझा भाऊ डॉक्टरांच्या केबिन बाहेर थांबला होता. मी एकटीच त्या केबिनमध्ये गेले होते. डॉक्टरांनी माझे डोळे तपासण्यास सुरुवात केली. परंतु, अचानकपणे त्यांनी मला तपासताना इतर ठिकाणी स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणांचा आणि माझ्या डोळ्यांचा काहीही संबंध नव्हता. त्यावेळी मी खूप घाबरले होते. त्यावेळी मला स्वत:चाच तिरस्कार वाटायला लागला होता. अनेकदा घरी कोणी नसताना मी कोपऱ्यात बसून खूप रडत होते. त्यावेळी आईला सांगायचं धाडस देखील मला झालं नव्हतं. जर मी हा सगळा प्रकार आईला सांगितलं तर ती माझीच चूक आहे असं म्हणेल", असं नीना गुप्ता यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना यांना डॉक्टरांप्रमाणेच टेलरचा देखील वाईट अनुभव आला होता. इच्छा नसतानाही त्यांना त्या टेलरकडे जाण्यास लागत होत. जर त्यावेळी टेलरकडे जायला मी नकार दिला असता तर आईने मला कारण विचारलं असतं. या भीतीपोटी मी टेलरकडे गपगुमान जात राहिले... अशा त्यांच्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टींवर त्यांनी या आत्मचरित्रात लिहिलं आहे.

वाचा : Shilpa Shetty ने हे काय केलंय केसांचं? मागून सफाचट केलेला शिल्पाचा Haircut झाला VIRAL! पाहा Video

नीना गुप्ता यांची मुलगी बॉलिवू़डमधील प्रसिद्ध ड्रेस डिजायनर आहे. नीना यांनी त्यांच्या या आत्मचरित्रात मुलगी मसाबा तसंच लग्न, त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ उतार याविषयी लिहिलं आहे. सध्या नीना यांचं "सच कहूँ तो" हे आत्मचरित्र चांगलेच चर्चेत आलं आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News