जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'Rakhi Sawant सोबत तेव्हाच लग्न करणार जेव्हा....'; पती रितेशचा लग्नावर धक्कादायक खुलासा

'Rakhi Sawant सोबत तेव्हाच लग्न करणार जेव्हा....'; पती रितेशचा लग्नावर धक्कादायक खुलासा

'Rakhi Sawant सोबत तेव्हाच लग्न करणार जेव्हा....'; पती रितेशचा लग्नावर धक्कादायक खुलासा

बिग बॉस 15(bigg Boss 15) मधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंतचा( Rakhi Sawant ) पती रितेशने त्याच्या दोन्ही लग्नांबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर- बिग बॉस 15**(bigg Boss 15)** मधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंतचा**( Rakhi Sawant )** पती रितेशने त्याच्या दोन्ही लग्नांबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. शोमध्ये आणि शोनंतरच्या अनेक मुलाखतींमध्ये राखीला पत्नी म्हणून सांगणाऱ्या रितेशने आता राखीसोबतचे लग्न वैध मानण्यास नकार दिला आहे. राखीसोबत अद्याप कायदेशीर लग्न झालेले नाही रितेशने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, राखी सावंतसोबत माझे अद्याप कायदेशीर लग्न झालेले नाही. रितेशने सांगितले की, त्याने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र तिनं अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. याचा अर्थ राखी सावंत कायदेशीररित्या अद्याप रितेशची पत्नी नाही. वाचा- Justin Bieber च्या गाण्यावर Alia Bhatt चा देसी डान्स; जबरदस्त VIDEO VIRAL रितेश राखीसोबत कधी लग्न करणार? Ht ला दिलेल्या मुलाखतीत रितेशने सांगितले की, जेव्हा त्याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे सिद्ध होतील तेव्हा तो राखी सावंतशी औपचारिकपणे लग्न करेल. रितेश म्हणाला, माझ्या पहिल्या पत्नीने केलेले आरोप मला माहित होते . त्यामुळे मला आधी हे सगळं क्लिअर करावं लागणार आहे मग मी औपचारिकपणे राखीसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. वाचा- भारती सिंहनं सर्वांसमोर पापाराझींकडे मागितला प्रसूती खर्च; VIDEO VIRAL रितेश पुढे म्हणाला की, मनात अनेक विचार येत होते. राखीचेही करिअर होते. माझेही बरेच प्रोजेक्ट्स चालू होते. रितेशने पहिल्या पत्नीवर आरोप केले आणि सांगितले की, घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु पत्नी कागदपत्रांवर सही करण्यास नकार देत आहे.

जाहिरात

रितेशच्या पत्नीनेही त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. मात्र, रितेशने हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले आहेत. आता राखी बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरच कळेल की तिच्या रितेशसोबतच्या नात्याचं नेमके गूढ काय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात